Join us
Daily Top 2Weekly Top 5

RCB vs SRH : क्लासेनच्या विकेटवरून वाद! मग शानदार कॅच घेत ईशानच्या शतकाआड आला फिल सॉल्ट (VIDEO)

ईशान किशन शतक झळकावेल, असे वाटत असताना सॉल्टन त्याच्या खेळीला ब्रेक लावला.   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 22:44 IST

Open in App

RCB vs SRH IPL 2026 Opener Match Phil Salt Grabs One Handed Catch Watch : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीनं आयपीएल २०२६ च्या स्पर्धेतील १९ व्या हंगामाला सुरुवात झाली. या सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलामीवीर फिल सॉल्टनं क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधार ईशान किशनला त्याने जबरदस्त झेल टिपत तंबूचा रस्ता दाखवला. ईशान किशन शतक झळकावेल, असे वाटत असताना सॉल्टन त्याच्या खेळीला ब्रेक लावला.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

फिल सॉल्टनं शानदार झेलसह लावला ईशानच्या खेळीला ब्रेक 

सनरायझर्स हैदराबदाच्या डावातील १६ व्या षटकात सॉल्टने डीप बॅकवर्ड पॉइंटवर धावत जाऊन उजवीकडे झेप घेत एका हातात अप्रतिम झेल पकडत ईशानच्या खेळीला ब्रेक लावला. ईशान किशन याने या सामन्यात ३८ चेंडूत ८० धावांची दमदार खेळी साकारली.  हा झेल स्पर्धेतील सर्वोत्तम झेलांपैकी एक ठरू शकतो.

त्याआधी क्लासेनच्या झेल ठरला वादग्रस्त

ईशानचा अप्रतिम झेल टिपण्याआधी हेन्री क्लासेनच्या विकेटवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.  त्याने खेळलेला उंच फटका सॉल्टने सीमारेषेजवळ पकडला. पण त्याचा पाय बाउंड्रीला लागला असावा, अशी चर्चा रंगली. ऑन-फिल्ड पंचांनाही शंका आल्याने तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली. त्यांनी क्लासेनला आउट दिले. तिसरे पंच रोहन पंडीत यांनी अनेक वेळा रिप्ले पाहून बाउंड्री दोर हलला नाही, असे मानत क्लासेनला बाद असल्याचा निर्णय दिला. मात्र सोशल मीडियावर या निर्णयावर मोठा वाद झाला. क्लासेनसह SRH ची मालकीण काव्या मारनही या निर्णयावर नाराज दिसली.

कोण आहे Jacob Duffy? ज्यानं पदार्पणाच्या सामन्यात एकाच षटकात अभिषेकसह हेडची केली शिकार

SRH ने उभारला २०१  धावांचा डोंगर

रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पॉवर प्लेमध्ये जेकब डफीनं भेदक मारा करत आघाडीच्या फलंदाजांना पॉवर प्लेमध्ये तंबूचा रस्ता दाखवला. अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड आणि नितीश कुमार रेड्डी स्वस्तात माघारी फिरल्यावर ईशान किशनच्या दमदार खेळीनंतर अनिकेत वर्मानं केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात सनरायझर्स हैदराबादनं ९ बाद २०१ धावा केल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : RCB vs SRH: Controversy over Klassen's wicket, Salt's stunning catch!

Web Summary : Controversy erupted over Klassen's wicket. Salt's brilliant catch dismissed Kishan, denying his century. SRH scored 201/9 after early wickets. Salt's catch was one of the best.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबादआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग