RCB vs RR Latest News : युजवेंद्र चहलने दिले धक्के, पण महिपाल, टेवाटिया यांचा हल्लाबोल

RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात आज सामना अबु धाबी येथे रंगत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 3, 2020 05:27 PM2020-10-03T17:27:01+5:302020-10-03T17:33:35+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs RR Latest News: Rajasthan Royals score 154-6 in 20 overs against Royal Challengers Bangalore | RCB vs RR Latest News : युजवेंद्र चहलने दिले धक्के, पण महिपाल, टेवाटिया यांचा हल्लाबोल

RCB vs RR Latest News : युजवेंद्र चहलने दिले धक्के, पण महिपाल, टेवाटिया यांचा हल्लाबोल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात आज सामना अबु धाबी येथे रंगत आहे. Indian Premier League ( IPL 2020) मधील दिवसा खेळवला जाणारा हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे दव फॅक्टर या सामन्यात तितका महत्त्वाचा ठरणार नाही. पण, UAEतील प्रचंड उकाड्याचा सामना करताना खेळाडूंचा कस लागणार हे निश्चित आहे. राजस्थान रॉयल्सचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर महिपाल लोम्रोर याने सावध खेळ करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. युजवेंद्र चहलनं (  Yuzvendra Chahal) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. राहुल टेवाटिया आणि जोफ्रा आर्चर यांनी अखेरच्या षटकांत हल्लाबोल केला. RCB vs RR Latest News & Live Score

देवदत्त पडीक्कलचा अफलातून झेल; जोस बटलरलाही बसला नाही विश्वास, Video

राजस्थान रॉयल्सचा ( RR) कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलर ( Jos Buttler) आणि स्मिथ यांनी RRच्या डावाची सावध सुरुवात केली. अंकित राजपूतच्या जागी RRनं आज महिपाल लोमरोर याला संधी दिली आहे. तिसऱ्या षटकात RCBला नशीबानं पहिले यश मिळवून दिले. इसुरू उडानाच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात स्मिथच्या बॅटनं इनसाईट एज घेतला आणि चेंडू यष्टींवर आदळला. स्मिथ 5 धावा करू शकला. पुढच्याच षटकात विराट कोहलीनं चेंडू नवदीप सैनीच्या हाती सोपवला आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर यश मिळवून दिले. सैनीनं टाकलेला चेंडू जोस बटलरच्या बॅटची कड घेऊन स्लीपच्या दिशेनं गेला अन् पहिल्या स्लीपमध्ये सुरेख झेल घेत RRला दुसरा धक्का दिला. बटलर 22 धावांवर माघारी परतला. RCB vs RR Latest News & Live Score

युजवेंद्र चहलचा भारी रिटर्न झेल, पण OUT or NOT OUT?; Video पाहून ठरवा तुम्हीच

युजवेंद्र चहलनंही पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अफलातून रिटर्न कॅच घेतली. पण, चहलनं टीपलेला चेंडू जमिनीला टेकला होता, त्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. चहलच्या चेंडूवर फटका मारताना संजू सॅमसन ( Sanju Samson) झेलबाद झाला. राजस्थानचे तीन फलंदाज 31 धावांवर माघारी परतले. रॉबिन उथप्पावर आज त्याच्या अनुभवाची उपयोग करून RRचा डाव सावरण्याची जबाबदारी होती. त्याच्या जोडीला पदार्पणवीर महिपाल लोम्रोर होता. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी सावध खेळ करून RRची धावसंख्या वाढवली. पण, 11व्या षटकात उथप्पा माघारी परतला. युजवेंद्र चहलनं त्याला ( 17) इसुरू उदानाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. RCB vs RR Latest News & Live Score

म्हातारपणी असा अपमान का करून घेतोस? अभिनेत्याचा MS Dhoniला निवृत्तीचा सल्ला; चाहत्यांनी घेतली शाळा

रियान पराग आणि पहिलाच सामना खेळणाऱ्या लोम्रोर या युवा खेळाडूंनी सावध खेळ करताना RRला शंभरी पार करून दिली. पण, या दोघांची 35 धावांची भागीदारी 16व्या षटकात संपुष्टात आली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पराग ( 16) माघारी परतला. पुढच्याच षटकात लोम्रोरही माघारी परतला. पण, त्यानं त्याची कामगिरी चोख बजावली. 1 चौकार व 3 षटकारांसह 39 चेंडूंत 47 धावा करणाऱ्या लोम्रोरला चहलने बाद केले. राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यांनी अखेरच्य षटकात हल्लाबोल चढवला अन् RRनं 6 बाद 154 धावा केल्या. RCB vs RR Latest News & Live Score

Web Title: RCB vs RR Latest News: Rajasthan Royals score 154-6 in 20 overs against Royal Challengers Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.