RCB vs RR Latest News : What a return catch by Yuzi Chahal, out or not out what's your decision? watch Video | RCB vs RR Latest News : युजवेंद्र चहलचा भारी रिटर्न झेल, पण OUT or NOT OUT?; Video पाहून ठरवा तुम्हीच

RCB vs RR Latest News : युजवेंद्र चहलचा भारी रिटर्न झेल, पण OUT or NOT OUT?; Video पाहून ठरवा तुम्हीच

RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात आज सामना अबु धाबी येथे रंगत आहे. Indian Premier League ( IPL 2020) मधील दिवसा खेळवला जाणारा हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे दव फॅक्टर या सामन्यात तितका महत्त्वाचा ठरणार नाही. पण, UAEतील प्रचंड उकाड्याचा सामना करताना खेळाडूंचा कस लागणार हे निश्चित आहे.  RCB vs RR Latest News & Live Score

राजस्थान रॉयल्सचा ( RR) कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलर ( Jos Buttler) आणि स्मिथ यांनी RRच्या डावाची सावध सुरुवात केली. अंकित राजपूतच्या जागी RRनं आज महिपाल लोमरोर याला संधी दिली आहे. तिसऱ्या षटकात RCBला नशीबानं पहिले यश मिळवून दिले. इसुरू उडानाच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात स्मिथच्या बॅटनं इनसाईट एज घेतला आणि चेंडू यष्टींवर आदळला. स्मिथ 5 धावा करू शकला. पुढच्याच षटकात विराट कोहलीनं चेंडू नवदीप सैनीच्या हाती सोपवला आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर यश मिळवून दिले. सैनीनं टाकलेला चेंडू जोस बटलरच्या बॅटची कड घेऊन स्लीपच्या दिशेनं गेला अन् पहिल्या स्लीपमध्ये सुरेख झेल घेत RRला दुसरा धक्का दिला. बटलर 22 धावांवर माघारी परतला.  RCB vs RR Latest News & Live Score

युजवेंद्र चहलनंही पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अफलातून रिटर्न कॅच घेतली. पण, चहलनं टीपलेला चेंडू जमिनीला टेकला होता, त्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. चहलच्या चेंडूवर फटका मारताना संजू सॅमसन ( Sanju Samson) झेलबाद झाला. राजस्थानचे तीन फलंदाज 31 धावांवर माघारी परतले. 

पाहा व्हिडीओ...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: RCB vs RR Latest News : What a return catch by Yuzi Chahal, out or not out what's your decision? watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.