यंदाच्या आयपीएलची विजेतेपदासाठीची लढत आज रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्समध्ये ही लढत होत आहे. अय्यरच्या नेतृत्वात फायनलमध्ये पोहोचलेला पंजाब हा तिसरा संघ ठरला आहे. या हंगामात हे दोन्ही संघ आतापर्यंत तीनवेळा भिडले आहेत, परंतू दोन सामने जिंकल्याने आरसीबीचे पारडे जड राहिलेले आहे. अशातच फायनलपूर्वी एक मोठी बातमी येत आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ही फायनल पाहण्यासाठी सुमारे १ लाख प्रेक्षक असणार आहेत. तर हॉटस्टारवर करोडो लोक हा सामना पाहणार आहेत. या तमाम क्रिकेटप्रेमींसाठी एक धक्का देणारी बातमी आली आहे. दोन्ही संघाचे दोन महत्वाचे खेळाडू जखमी असल्याचे वृत्त येत आहे.
आरसीबीचा स्फोटक फलंदाज टिम डेव्हिड तंदुरुस्त नाहीय. यामुळे आरसीबीची चिंता वाढली आहे. डेव्हिडला लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी उतरविले जाणार होते. जर डेव्हिड तंदुरुस्त झाला नाही तर मग लिव्हिंगस्टोनच्या जागी किवी खेळाडू टिम सिर्फला घ्यायचे की नाही यावर विचार करावा लागणार आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि संघ प्रशासन यावर विचार करत आहेत. दुसरी एक चिंतेची बाब म्हणजे फिल साल्टला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. यामुळे तो या अंतिम सामन्यात असेल की नाही यावर प्रश्नचिन्ह असल्याचे क्रिकइन्फोने म्हटले आहे.
या दोन खेळाडूंशिवाय आरसीबी फायनलमध्ये उतरली तर विराटसोबत टिम सीफर्ट ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. मग फिनिशरची जबाबदारी रोमारियो शेफर्डवर येऊन पडणार आहे.
एकीकडे आरसीबी या दोन खेळाडूंच्या सहभागावरून चिंतेत असताना दुसरीकडे पंजाब किंग्सला देखील लेग स्पीनर युझवेंद्र चहलच्या फिटनेसची चिंता सतावत आहे. पंजाबच्या सहाय्यक प्रशिक्षकांनी मुंबईला हरविल्यानंतर चहल १०० टक्के फिट नसल्याचे म्हटले होते. फायनलमध्ये जर चहल खेळला नाही तर हरप्रीत बरारला खेळविले जाण्याची शक्यता आहे.
Web Title: RCB vs PBKS IPL 2025 Final Playing XI: Big news before the IPL final! Two important players from both teams unfit; Another player...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.