रॉयल चँलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी बुधवारच्या सामन्यात चांगलीच कमाल केली आहे. त्यांनी यंदाच्या सत्रात पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी ३ बाद १७ धावा देण्याचा विक्रम केला. त्यात मोहम्मद सिराजच्या पहिल्या दोन निर्धाव षटकांचा समावेश होता. आयपीएलमध्ये फक्त फलंदाजांचेच नाही तर काही प्रसंगी गोलंदाजांचेही वर्चस्व असते हे यासारख्या काही सामन्यातून दिसून येते.
जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज याने राहूल त्रिपाठी, नितीश राणा आणि टॉम बँटन यांना तंबूत पाठवत आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली. त्याच्या गोलंदाजीमुळे आरसीबीने केकेआरला पहिल्या पॉवरप्लेमध्ये यंदाच्या सत्रात सर्वात कमी धावा करु दिल्या. कोलकाता नाईट रायडर्सची ही पॉवर प्ले मधील सर्वात खराब कामगिरी आहे.
आतापर्यंत केकेआरची पॉवरप्लेमधील कमी धावसंख्या
१७/४ विरुद्ध आरसीबी अबुधाबी २०२०
२१/३ वि. डेक्कन चार्जस केप टाऊन २००९
२२/४ वि.सीएसके चेन्नई २०१०
२४/३ वि. किंग्ज इलेव्हन पंजाब अबु धाबी २०१४
असे असले तरी पॉवर प्ले मध्ये सर्वात खराब कामगिरी करणारा केकेआर हा काही एकटाच संघ नाही. यात इतर संघाचाही समावेश आहे. ज्यांनी कोलकाता पेक्षाही खराब कामगिरी पॉवर प्लेमध्ये केली आहे.
आयपीएलच्या इतिहासातील पॉवरप्लेमधील निचांकी धावसंख्या
१४/२ राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी २००९
१६/२ चेन्नई सुपर किंग्ज वि. केकेआर २०११
१६/१ सीएसके वि. दिल्ली डेअरडेविल्स २०१५
१६/१ सीएसके वि. आरसीबी २०१९
१७/१ आरसीबी वि. सीएसके २०१४
१७/३ मुंबई वि. पंजाब २०१५