Join us  

RCB vs DC Latest News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पराभूत होऊनही कसे झाले Playoffs साठी पात्र; विराट कोहलीनं समजावलं गणित

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)नंतर दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांनी प्ले ऑफचं तिकिट पक्कं केलं.

By स्वदेश घाणेकर | Published: November 02, 2020 11:18 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)नंतर दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांनी प्ले ऑफचं तिकिट पक्कं केलं. MI vs DC असा क्वालिफायर १ चा सामना ५ नोव्हेंबरला होईल. DCनं सोमवारी अखेरच्या साखळी सामन्यात RCBवर सहज विजय मिळवून १६ गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान पक्के केले. या पराभवानंतरही RCBनं प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला. आता कोलकाता नाईट रायडर्सला ( KKR) सनरायझर्स हैदराबादच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. पण, RCBनं हे समिकरण कसं जुळवलं? प्रथम फलंदाजी करणाऱ्या RCBसाठी देवदत्त पडीक्कल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी दमदार कामगिरी केली. देवदत्तनं ४१ चेंडूंत ५ चौकारांसह ५० धावा केल्या, तर एबीनं २१ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ३५ धावा केल्या. RCBला ७ बाद १५२ धावाच करता आल्या. कागिसो रबाडानं ३० धावांत २ विकेट्स घेतल्या. अॅनरिच  नॉर्ट्झेनं ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  प्रत्युत्तरात पृथ्वी शॉ ( ९) याला आजही अपयश आले असले तरी शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे दमदार खेळ करताना RCBच्या गोलंदाजांना हतबल केलं. धवन ४१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५४ धावांवर माघारी परतला. रहाणेनं ४६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ६० धावा केल्या. दिल्लीनं हा सामना १९ षटकांत ४ बाद १५४ धावा करून जिंकला. पराभवानंतरही RCB कसे ठरले पात्र?विराट कोहलीनं सांगितलं की,''आम्हाला विजय मिळवायचा होता. पण, ते शक्य झालं नाही. ११व्या षटकात मॅनेजमेंटकडून मॅसेज आला आणि त्यांनी आम्हाला सामना १७.३ षटकापर्यंत लांबवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नेट रन रेट हा चांगला राहिला आणि आम्ही प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकलो. आता आम्हाला अंतिम सामन्यात जाण्यासाठी दोन सामने खेळावे लागतील. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.'' 

  • DCनं विजयासह १६ गुण खात्यात जमा केले आणि -०.१०९ असा त्यांचा नेट रन रेट आहे.
  • RCBनं पराभूत होऊनही त्यांचा नेट रन रेट हा -०.१७२ असा ठेवला आणि KKRपेक्षा ( -०.२१४) तो अधिकच राहिल्यानं त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का केला.

काय होतं गणित?

  • दिल्ली कॅपिटल्सला किमान १३४ धावा तरी कराव्या लागतील, मग ते पराभूत होऊनही नेट रन रेटच्या जोरावर KKRपेक्षा सरस ठरतील.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला DC ला किमान १७.३ षटकं खेळवण्यास भाग पाडावं लागेल, त्यानंतर RCB पराभूत होऊनही नेट रन रेटच्या जोरावर KKRच्या पुढे राहतील.

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादविराट कोहली