बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नवा पराक्रम केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक ५०० किंवा त्यापेक्षा धावा करणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने आयपीएलच्या एकूण ८ हंगामात ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५०० धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये यादीत डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या क्रमाकावर आहे. त्यानंतर केएल राहुल तिसर्या, शिखर धवन चौथ्या आणि ख्रिस गेल पाचव्या स्थानवर आहे.
डेव्हिड वॉर्नरने सात वेगवेगळ्या हंगामात ५००+ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी २०१६ मध्ये नोंदवली गेली, जेव्हा त्याने ८४८ धावा केल्या आणि सनरायझर्स हैदराबादला पहिले आयपीएल जेतेपद मिळवून दिले. केएल राहुल आतापर्यंत चार वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळला आहे. केएल राहुलने पाच वेळा ५००+ धावा केल्या आहेत. शिखर धवननेही पाच वेळा ५००+ आयपीएल धावा केल्या आहेत. वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने सलग तीन वेळा (२०११, २०१२ आणि २०१३) ५०० धावांचा टप्पा गाठला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५०० धावा करणारे फलंदाज१) विराट कोहली- ८२) डेव्हिड वॉर्नर- ७३) केएल राहुल- ५४) शिखर धवन- ५५) ख्रिस गेल- ३
विराट कोहलीची वादळी खेळीबंगळुरूविरुद्ध सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फंलदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात विराट कोहलीने अवघ्या ३३ चेंडूत ६२ धावा केल्या, ज्यात पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज सॅम करनने त्याला झेलबाद केले.