चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तडाखेबाज फलंदाज रोमारियो शेफर्डने गोलंदाजाच्या डोळ्यात पाणी आणले. शेफर्डने ३७९ च्या स्ट्राईक रेटने फक्त १४ चेंडूत ५३ धावा केल्या. या कामगिरीसह शेफर्ड आयपीएलध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम राजस्थान रॉयलचा यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे. जैस्वालने २०१३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अवघ्या १३ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यानंतर या यादीत केएल राहुल दुसऱ्या, पॅट कॅमिन्स तिसऱ्या, रोमारियो शेफर्ड चौथ्या स्थानावर आहेत. या सर्व फलंदाजांनी प्रत्येकी १४ चेंडूत अर्धशतक केले आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक१) यशस्वी जैस्वाल- १३ चेंडू (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध, २०१३)२) केएल राहुल- १४ चेंडू (मुंबई इंडियन्स विरुद्ध, २०१८)३) पॅट कमिन्स- १४ चेंडूस (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध, २०२२)४) रोमारियो शेफर्ड- १४ चेंडू (चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध २०२५)
आरसीबीचे चेन्नईसमोर २१३ धावांचे लक्ष्यया सामन्यात चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबीच्या संघाने २० षटकांत पाच विकेट्स गमावून २१३ धावांचे लक्ष्य ठेवले. सलामीवीर जेकब बेथेल (३३ चेंडू ५५ धावा) आणि विराट कोहलीने (३३ चेंडूत ६२ धावा) वादळी सुरुवात करून दिली. त्यानंतर अखरेच्या दोन षटकांत रोमारिओ शेफर्डने (१४ चेंडूत ५३ धावा) मैदानात धावांचा पाऊस पाडला. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, सॅम करन आणि नूर अहमदला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.