"तुम्ही सदैव आमच्या हृदयात..." फॅमिलीतील 'त्या' ११ RCBian साठी आरसीबीची भावूक पोस्ट

ही आदरांजली ४ जून २०२५ रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर देण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 16:48 IST2026-03-28T16:36:34+5:302026-03-28T16:48:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
RCB to Honour Stampede Victims with 11 Permanent Empty Seats Throughout IPL 2026 | "तुम्ही सदैव आमच्या हृदयात..." फॅमिलीतील 'त्या' ११ RCBian साठी आरसीबीची भावूक पोस्ट

"तुम्ही सदैव आमच्या हृदयात..." फॅमिलीतील 'त्या' ११ RCBian साठी आरसीबीची भावूक पोस्ट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने आयपीएल २०२५ विजेतेपद परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या ११ चाहत्यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. आयपीएल २०२६ च्या उद्घाटन सामन्यापूर्वी या उपक्रमांची घोषणा करण्यात आली. यामध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ११ आसने कायमस्वरूपी रिक्त ठेवणे, खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधणे आणि सराव सत्रांमध्ये विशेष जर्सी क्रमांक वापरणे यांचा समावेश आहे. गत चॅम्पियन आरसीबी संघ शनिवारी, २८ मार्च रोजी आपल्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीनं यंदाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

एक भावपूर्ण स्मरण

आरसीबीनं दुर्देवी घटनेत जीव गमावलेल्या ११ चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर करत कोणत्या स्टँडमधील आसने रिकामी ठेवण्यात येणार  त्यासंदर्भातील माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय की, ४ जून रोजी आपल्या RCB परिवारातील जीव गमावलेल्या ११ सदस्यांच्या सन्मानार्थ आम्ही पुढील काळात पी १ स्टँडमधील ११ जागा कायमस्वरूपी रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गोष्ट  त्यांचे  संघाशी असलेल्या अटळ नात्याचं प्रतीक आहे. एकदा RCBian म्हणजे कायमचा RCBian असा उल्लेखही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

IPL 2026 : पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकायला १८ वर्षे लागली! आता RCB ला खुणावतोय CSK अन् MI चा महारेकॉर्ड

 
दुःखद घटना

ही आदरांजली ४ जून २०२५ रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर वाहण्यात आली आहे. RCB च्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या सेलिब्रेशनदरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले होते. सुमारे ३ लाखांहून अधिक लोकांच्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.

स्टेडियमवरील सामन्यावरील बंदी हटली

या घटनेनंतर कर्नाटक सरकारने आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या इव्हेंट आयोजकांना गर्दी नियंत्रणातील त्रुटींमुळे जबाबदार धरले होते. त्यानंतर RCB ने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. या घटनेनंतर स्टेडियममध्ये RCB चा सामना झालेला नव्हता, मात्र आता सरकारने या हंगामात पाच घरच्या सामन्यांना परवानगी दिली आहे, तर दोन सामने रायपूर येथे होणार आहेत.
 

 

Web Title : आईपीएल परेड त्रासदी में मारे गए 11 प्रशंसकों को आरसीबी का सम्मान।

Web Summary : आरसीबी 2025 आईपीएल परेड त्रासदी में मारे गए 11 प्रशंसकों को सम्मानित करेगी. श्रद्धांजलि में आरक्षित स्टेडियम सीटें, काली पट्टी और विशेष अभ्यास जर्सी शामिल हैं. प्रतिबंध हटने के बाद आरसीबी सनराइजर्स हैदराबाद के खिलाफ अपने सत्र की शुरुआत करेगी.

Web Title : RCB Honors 11 Fans Lost in IPL Parade Tragedy.

Web Summary : RCB will honor 11 fans who died in a 2025 IPL parade tragedy. Tributes include reserved stadium seats, black armbands, and special practice jerseys. RCB starts its season against Sunrisers Hyderabad after a ban was lifted.