Yash Dayal Out of IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी RCB च्या ताफ्यातून एक मोठी माहिती समोर आली आहे. गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज यश दयाल संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. RCB चे डायरेक्टर बोबाट यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. याआधीच RCB ला जोश हेजलवूडच्या रूपाने मोठा धक्का बसला होता. ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज सुरुवातीच्या सामन्याला मुकणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!यश दयालसंदर्भात RCB च्या संचालकांनी दिली माहिती
यश दयालबाबत RCB चे संचालक मो बोबाट यांनी सांगितले की, तो या हंगामात RCB साठी उपलब्ध राहणार नाही. वैयक्तिक कारणास्तव त्याने हा निर्णय घेतला आहे. RCB ने अद्याप त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केलेली नाही. आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू फ्रँचायझी यश दयालच्या जागी दुसऱ्या कोणत्या खेळाडूला संधी देते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील हंगामात यश दयालने RCB साठी चांगली गोलंदाजी केली होती. त्याने एकूण १३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने माघार घेतली की, त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले? हा एक वेगळाच प्रश्न आहे.
IPL 2026 : लग्न की, विघ्न..! RCB च्या ताफ्यातून 'हा' गोलंदाज 'गायब' होण्यामागचं कारण काय?
टीम बसच्या पोस्टरवरुन 'गायब' झाला अन्...
यश दयालबाबत अलीकडच्या काळात अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या. तो या हंगामात अद्याप RCB च्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी झाला नव्हता. त्यानंतरच त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. स्पर्धा सुरू होण्याच्या अवघ्या चार दिवस आधी RCB च्या डायरेक्टरने स्पष्ट केले की, तो संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. अलीकडे सोशल मीडियावर IPL 2026 साठी RCB च्या टीम बसचे फोटो समोर आले होते. त्यामध्ये सर्व खेळाडूंचे चेहरे दिसत होते, मात्र यश दयालचा फोटो त्यात नव्हता. मैदानाबाहेरील वादग्रस्त प्रकरणात अडकल्यामुळे RCB च्या संघाने त्याला बाहेर ठेवलं असण्याची शक्यताही त्यामुळे निर्माण झाली आहे.
Web Summary : RCB's Yash Dayal is out of IPL 2026 due to personal reasons, confirmed by Director Bobat. This follows news of Hazlewood's unavailability for early matches. Dayal's absence and the team bus poster lacking his image raise questions about his departure.
Web Summary : आरसीबी के यश दयाल ने निजी कारणों से आईपीएल 2026 से नाम वापस ले लिया है, निदेशक बोबाट ने पुष्टि की। यह खबर हेज़लवुड की शुरुआती मैचों के लिए अनुपलब्धता के बाद आई है। दयाल की अनुपस्थिति और टीम बस पोस्टर में उनकी छवि की कमी उनके जाने पर सवाल उठाती है।