Join us

Virat Kohli: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वीच RCB ला धक्का; विराट कोहली कर्णधारपद सोडणार?

विराट कोहलीच्या या निर्णयानंतर क्रिकेट विश्वात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. कोहलीच्या या निर्णयामागे विविध कारणं तज्ज्ञांनी सांगितली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 15:03 IST

Open in App

नवी दिल्ली – टी-२० स्पर्धेत भारतीय टीमचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेत खेळाडू विराट कोहलीनं सगळ्यांनाच धक्का दिला. १६ सप्टेंबर रोजी विराटनं त्याच्या सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टी-२० फॉर्मेटचं कर्णधारपद न स्वीकारण्याचा निर्णय कोहलीनं घेतला आहे. वर्कलोड कारण पुढे करत विराट कोहलीनं (Virat Kohli) क्रिकेटच्या या स्पर्धेतून कर्णधारपद सोडण्याचं जाहीर केले. ३२ वर्षीय विराट कोहली फलंदाजीवर अधिक फोकस करणार असल्याचं सांगत आहे.

विराट कोहलीच्या या निर्णयानंतर क्रिकेट विश्वात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. कोहलीच्या या निर्णयामागे विविध कारणं तज्ज्ञांनी सांगितली आहेत. यातच कोहलीचे सर्वात आधीचे कोच राजकुमार शर्मा यांनी त्यांचे मत मांडले आहे. आयसीसी टूर्नामेंट न जिंकल्याने विराट कोहलीनं हा निर्णय घेतलाय का? असा प्रश्न शर्मा यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, विराट कोहलीच्या मनात हा फॅक्टर आलाच नसेल. कर्णधार म्हणून विराटनं उत्तम कामगिरी केली आहे. आयसीसी टूर्नामेंट न जिंकण्याबाबत काही असेल तर मला वाटत नाही इतका मोठा टॅग आहे. तुम्ही कोहलीचे रेकॉर्ड बघू शकता. प्रत्येक फॉर्मेटमध्ये विराट कोहली यशस्वी कर्णधारांपैकी एक असल्याचं सिद्ध झालंय असं राजकुमार शर्मा म्हणाले.

तसेच कुठल्याही कर्णधाराला आयसीसी ट्रॉफीच्या आधारे चांगला अथवा वाईट ठरवू शकत नाही. कोहलीचा रेकॉर्ड सांगतो की, त्याने कर्णधार आणि खेळाडू म्हणून देशासाठी काय केलंय. येणाऱ्या काळात विराट कोहली रॉयल चँलेंजर्स बंगळुरु(RCB)चं कॅप्टनपदही सोडू शकतो. IPL बाबत म्हटलं तर पुढील काळात कोहली आरसीबीचं कर्णधारपद सोडू शकतो. खेळाडू म्हणून तो खेळेल. कोहलीनं त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलेले चांगले आहे. त्याचसोबत वन डे आणि कसोटी सामन्यांवरही फोकस ठेवता येईल असं राजकुमार शर्मा म्हणाले.

वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर विराट कोहलीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

विराट कोहलीनं ४५ टी-२० सामन्यात भारतीय टीमचं नेतृत्व केले आहे. त्यातील २७ सामन्यांत भारताचा विजय झाला आहे. टीम इंडियानं टी-२० वर्ल्ड कप जिंकावा आणि जाता जाता आयसीसी ट्राफी त्यांच्या खात्यात यावी हा विराट कोहलीचा प्रयत्न असेल. कोहली सध्या आयपीएल १४ च्या दुसऱ्या पर्वाची तयारी करत आहे. टूर्नामेंटची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. कोहलीची टीम आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी ७ मॅचपैकी ५ मॅचमध्ये विजय मिळवला आहे.

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२१टी-२० क्रिकेट
Open in App