अबूधाबीमध्ये ज्यावेळी आरसीबी-दिल्ली कॅपिटल्स लढत होईल त्यावेळी एक संघ आगेकूच करेल तर एक संघ पिछाडीवर पडेल. जिंकणारा संघ अव्वल दोनमध्ये स्थान मिळवेल आणि अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळेल. पराभूत संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकतो किंवा जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेरही फेकला जाऊ शकतो. अखेरच्या टप्प्यात सहा संघ प्ले-ऑफच्या तीन स्थानांसाठी लढत देत आहेत.
मुंबई इंडियन्स प्ले-ऑफसाठी पात्र ठरला आहे. आमचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करण्यावर केंद्रित झाले आहे. आठवडाभरापूर्वी आरसीबी व दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ सहज प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील, असे भासत होते. पण, दिल्लीने अखेरचे चार तर आम्ही अखेरचे तीन सामने गमावले. सर्वकाही क्षणात घडले.आम्ही गत तीन लढतीबाबत विचार करीत नसून यानंतरच्या तीन लढतीबाबत विचार करीत चॅम्पियन होण्याचा विचार करीत आहोत. चॅम्पियन होण्यासाठी सर्वप्रथम दिल्लीविरुद्ध विजय मिळवावा लागेल त्यामुळे आम्हाला अव्वल दोन स्थानावर राहता येईल. त्यानंतर मुंबई इंडियन्सला पराभूत करावे लागेल.
तणाव आणि दडपणात पहिला पंच मनाप्रमाणे लागणे गरजेचे असेल. पॉवरप्लेमध्ये गडी बाद करणे असो वा फलंदाजीत धडाकेबाज सुरुवात असो, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. यामुळे यशाची सुरुवात होते. याशिवाय बेसिक्सवर कायम राहू.यासाठी अष्टपैलू कामगिरी होण्याची गरज आहे.
त्यासाठी एकसंघपणे तसेच एकमेकांचा सन्मान राखून खेळ करू. प्रतिस्पर्धी संघ आणि आयपीएलचा सन्मान राखून आरसीबीने संतुलित खेळ केला आहे. यानंतर खेळात सातत्य मिळवू शकलो तर आमच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहायला लागेल. (टीसीएम)