इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या उद्घाटन सामना हा ठरल्याप्रमाणे बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार हे निश्चित झाले आहे. बीसीसीआयने पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून या वेळापत्रकानुसार २८ मार्च, २०२६ रोजी ठरल्याप्रमाणे गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे. हा सामना बंगळुरुच्या मैदानात होणार की नाही यासंदर्भात संभ्रम होता. पण आता कर्नाटक सरकारकडून RCB आणि KSCA यांना IPL सामन्याच्या आयोजनासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कर्नाटक सरकारने KSCA ला दिली होती १५ मार्चपर्यंत मुदत
आयपीएलच्या गत हंगामात RCB च्या विजयानंतर विजय मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. ज्यात ११ लोकांनी आपला जीव गमावला होता. त्यानंतर स्टेडियमच्या सुरक्षाव्यवस्था आणि पायाभूत सुविधांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत न्यायमूर्ती डी’कुन्हा समितीने सुरक्षेसंदर्भात अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) ला १५ मार्चपर्यंत सर्व आवश्यक सुधारणा पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात आला होता आणि त्यांनी ते काम पूर्ण केले आहे. त्यामुळे आता KSCA ला सामना आयोजित करण्याची परवानगी मिळाली आहे.
वैभव सूर्यवंशी नशिबाच्या जोरावर चमकणारा 'हिरा'? IPL 2026 आधी भारताच्या माजी दिग्गजाचे मोठं वक्तव्य
चिन्नास्वामीत खेळला जाणार RCB vs CSK सामना
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियम उद्घाटन सामन्यासोबतच ५ एप्रिल रोजी चेन्नई विरुद्धचा सामनाही या मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहे. यंदाच्या हंगामात RCB चा संघ आपल्या घरच्या मैदानातील पाच सामने बंगळुरुच्या मैदानात तर दोन सामने रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियममध्ये खेळणार आहे.
रजत पाटीदारच असणार RCB चे कर्णधार
आयपीएल २०२५ च्या हंगामात पंजाब किंग्सचा पराभूत करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पहिल्यांदा IPL ट्रॉफी जिंकली होती. यावेळीही RCB ला पहिली ट्रॉफी जिंकून देणारा रजत पाटीदारच संघाचे नेतृत्व करेल. याशिवाय विराट कोहलीची धमाकेदार फलंदाजी पाहण्यासाठीही चाहते आतूर आहेत.
Web Summary : IPL 2026's opening match between RCB and SRH is confirmed for Bengaluru. Karnataka government approved the match after safety concerns. RCB will play five home games in Bengaluru and two in Raipur. Rajat Patidar will captain RCB.
Web Summary : आईपीएल 2026 का पहला मैच आरसीबी और एसआरएच के बीच बेंगलुरु में होगा। सुरक्षा चिंताओं के बाद कर्नाटक सरकार ने मैच को मंजूरी दे दी। आरसीबी बेंगलुरु में पांच और रायपुर में दो घरेलू मैच खेलेगी। रजत पाटीदार आरसीबी के कप्तान होंगे।