Join us

Ravindra Jadeja vs CSK IPL 2022 : रवींद्र जडेजाचे चेन्नई सुपर किंग्ससोबत फिसकटले?; फ्रँचायझीने इंस्टाग्रामवर अनफॉलो केले! 

Ravindra Jadeja vs CSK IPL 2022 : अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून माघार घेण्याच्या तयारीत आहे. यामागे दुखापतीचं कारण दिले जात आहे, परंतु....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 16:49 IST

Open in App

Ravindra Jadeja vs CSK IPL 2022 : अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून माघार घेण्याच्या तयारीत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत जडेजाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण, अशात  CSK फ्रँचायझी व जडेजा यांच्यात मतभेद झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि त्यामागे कारणही तसेच आहे. गतविजेत्या Chennai Super Kings ने रवींद्र जडेजाला इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनफॉलो केले आहे. त्यामुळे CSK व जडेजा यांच्यात वाद असल्याचे बोलले जात आहे.

आयपीएल २०२२ला सुरुवात होण्याआधी महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवली. CSKच्या पुढील वाटचालीचा विचार करून हा निर्णय घेतला गेला होता, परंतु जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी निराशाजनक झाली. कर्णधारपदाचे दडपण जडेजाच्या कामगिरीवरही जाणवले आणि त्याला १० सामन्यांत केवळ ११६ धावा व ५ विकेट्स अशी कामगिरी करता आली आहे. त्यामुळेच  पुन्हा धोनीकडे नेतृत्व सोपवण्यात आले आणि त्यानंतर संघाची गाडी रुळावर आलेली पाहायला मिळतेय..

त्यात सोशल मीडियावर CSK ने रवींद्र जडेजाला  इंस्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचा दावा केला जात आहे. त्यावरून विविध तर्क लावले जात आहेत.     पण, याच ट्विटच्या खाली चेन्नई सुपर किंग्स अजूनही रवींद्र जडेजाला फॉलो करत असल्याचे ट्विट करण्यात आलेले आहेत.

मात्र, 'लोकमत'ने जेव्हा CSK फॉलो करत असलेल्यांची लिस्ट पाहिली त्यात जडेजाचे नाव नाही दिसले. 

टॅग्स :आयपीएल २०२२रवींद्र जडेजामहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स
Open in App