Join us  

पत्नीसोबत ड्राईव्हसाठी बाहेर पडला रवींद्र जडेजा; मास्कवरून महिला पोलिसांसोबत हुज्जत

भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा मंगळवारी नकोशा कारणामुळे चर्चेत आला. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्यामुळे रवींद्र जडेजा राजकोट ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 3:29 PM

Open in App

भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा मंगळवारी नकोशा कारणामुळे चर्चेत आला. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्यामुळे रवींद्र जडेजा राजकोट येथील त्याच्या घरात आहे. पण, सोमवारी रात्री तो पत्नीसह ड्राईव्हसाठी बाहेर पडला आणि त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकारीसोबत मास्कवरून हुज्जत घातल्याचे वृत्त समोर येत आहे.

साक्षी धोनीनं शेअर केला जिवा अन् लहान बाळाचा फोटो; नेटिझन्सनी केलं अभिनंदन

गोसाई असे या महिला पोलीस अधिकारीचे नाव असून रवींद्र आणि त्याची पत्नी रिवाबा हे गाडीत बसले होते आणि त्यांनी मास्क न घातल्यानं तिनं त्यांना रोखले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सोमवारी रात्री 9 वाजता किसन्पारा चौक येथे महिला पोलीस अधिकारीनं जडेजाची गाडी अडवली. तेव्हा मास्क न घालत्यामुळे पोलिसांनी भारतीय खेळाडूला दंड भरण्यास सांगितला आणि त्यानंतर दोघांमध्ये हुज्जत झाली.  

संधी मिळाल्यास अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी नक्की येईन; पाकिस्तानी क्रिकेटपटूची इच्छा 

तिनं जडेजाकडे वाहन परवानाही मागितला. जडेजाच्या पत्नीनं मास्क घातला होता की नाही, हे समजलेले नाही. या प्रकारानंतर जडेजानं पोलिसांना सांगितले की गोसाई हे उद्धटपणानं आपल्याशी बोलत होत्या. या घटनेनंतर गोसाई तणावाच्या समस्येमुळे तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. पोलीस उप आयुक्त मनोहरसिंह जडेजा यांनी भारतीय खेळाडू आणि पोलीस अधिकारी यांनी एकमेकांविरोधात उद्धट वागणुकीची तक्रार केली. माझ्या माहितीनुसार जडेजान मास्क घातला होता आणि त्याच्या पत्नीनं मास्क घातला होता की नाही, याचा तपास करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

शाहरूख खानच्या संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्ड करणार; ड्वेन ब्राव्होही एकाच संघाकडून खेळणार

Video : 140 किलोच्या रहकीम कोर्नवॉलच्या नावावर आहे CPLमधील 'वजन'दार विक्रम!

कॅरेबियन लीगचा थरार पुढील आठवड्यापासून सुरू होणार; लीगचं वेळापत्रक एका क्लिकवर!

 

टॅग्स :रवींद्र जडेजाकोरोना वायरस बातम्या