शाहरूख खानच्या संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्ड करणार; ड्वेन ब्राव्होही एकाच संघाकडून खेळणार

CPL 2020:  कॅरेबियन प्रीमिअर लीगला ( CPL 2020) पुढील आठवड्यापासून सुरूवात होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 02:27 PM2020-08-11T14:27:56+5:302020-08-11T14:28:25+5:30

whatsapp join usJoin us
CPL 2020:  Kieron Pollard to continue as TKR captain in CPL 2020; SQUADS FOR HERO CPL CONFIRMED | शाहरूख खानच्या संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्ड करणार; ड्वेन ब्राव्होही एकाच संघाकडून खेळणार

शाहरूख खानच्या संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्ड करणार; ड्वेन ब्राव्होही एकाच संघाकडून खेळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 कॅरेबियन प्रीमिअर लीगला ( CPL 2020) पुढील आठवड्यापासून सुरूवात होणार आहे. नुकतेच या लीगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. जगभरातील सर्व ट्वेंटी-20 लीगमध्ये कॅरेबीयन लीगचीही प्रचंड चर्चा आहे. 18 ऑगस्टपासून या लीगला सुरू होणार असून 33 सामने खेळवण्यात येणार आहेत. टॉरूबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत 23 आणि पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर 10 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे. 10 सप्टेंबरला लीगचा अंतिम सामना होईल. ( SQUADS FOR HERO CPL CONFIRMED) 

यंदा शाहरूख खानच्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्डकडे असणार आहे. ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखाली नाइट रायडर्सनं 2017 आणि 2018चे सीपीएल जेतेपद पटकावले होते. पण, ब्राव्होनं यंदा कर्णधारपद नको, असे मालकांना सांगितल्यानं ती जबाबदारी पोलार्डकडे सोपवण्यात आली आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ब्रोव्हो चेन्नई सुपर किंग्सकडून, तर पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून खेळतो. ( SQUADS FOR HERO CPL CONFIRMED)

जाणून घेऊया कोणत्या संघात कोण...

  • थलाव्हास - आंद्रे रसेल, संदीप लॅमीछाने, कार्लोस ब्रेथवेट, रोवमन पॉवेल, मुजीब उर रहमान, ग्लेन फिलिप्स, चॅडवीच वॉल्टन, ओशाने थॉमस, असीफ अली, फिडेल एडवर्ड, प्रेस्टन मॅकस्वीन, जेर्मेन ब्लॅकवूड, निकोलस कर्टन, रमाल लेवीस, एक्रुमाह बोन्नार, वीरसाम्मी पेरमौल, रियान पर्सौड
  • झौक्स - रोस्टन चेस, मोहम्मद नबी, डॅरेन सॅमी, नजीबुल्लाह झादरान, आंद्रे फ्लेचर, केसरीच विलियम, स्कॉट कुगेलेईंज, चेमार होल्डर, ओबेड मॅकॉय, रहकीम कोर्नवॉल, मार्क डेयाल, झहीर खान, किमानी मेलीअस, लेनिको बाऊचर, केव्हम हॉज, जेवेल ग्लेन, साद बीन जाफर
  • नाइट रायडर्स - ड्वेन ब्राव्हो, किरॉन पोलार्ड, सुनील नरीन, कॉलीन मुन्रो, फवाद अहमद, डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स, खॅरी पिएरे, टीम सेईफर्ट, सिकंदर रजा, अँडरसन फिलीप, प्रविण तांबे, जयडेन सील्स, आमीर जँगू, टिऑन, वेबस्टर, एकील होसेन, मुहम्मद अली खान

  • पॅट्रीओट्स - ख्रिस लीन, बेन डंक, एव्हीन लुईस, निक केल्ली, सोहैल तन्वीर, इश सोढी, शेल्डन कोट्रेल, दानीश रामदिन, रयाद एमरीट, इम्रान खान, अल्झारी जोसेफ, जोशूआ डी सिल्वा, डॉमिनिक ड्रॅकेस कॉलीन आर्चिबॅल्ड, जॉन रस गॅजेसर, जॅहमर हॅमिल्टन
  • ट्रायडंट्स - रशीद खान, जेसन होल्डर, कोरी अँडरसन, शॅमार्ह ब्रुक्स, मिचेल सँटनर, जॉन्सन चार्ल्स, शे होप, हेडन वॉल्श ज्यु., अॅशली नर्स, जॉनथन कार्टर, रेयमन रेईफर, कायले मेयर्स, जोशूआ बिशॉप, एनयीम यंग, जस्टीन ग्रीव्हेस, किऑन हार्डींग, शयान जहांगीर
  • वॉरियर्स - इम्रान ताहीर, निकोलस पूरन, ब्रँडन किंग, रॉस टेलर, शिमरोन हेटमायर, ख्रिस ग्रीन, किमो पॉल, शेर्फान रुथरफोर्ड, नवीन उल हक, चंद्रपॉल हेमराज, केव्हीन सिंक्लेअर, अशमेद नेड, ओडीन स्मिथ, अँथोनी ब्रॅम्बेले, जसदीप सिंह, किसूंदथ मॅग्राम.

Video : 140 किलोच्या रहकीम कोर्नवॉलच्या नावावर आहे CPLमधील 'वजन'दार विक्रम!

कॅरेबियन लीगचा थरार पुढील आठवड्यापासून सुरू होणार; लीगचं वेळापत्रक एका क्लिकवर!

विमान पकडण्यासाठी पोहोचला नाही वेळेत अन् आता ट्वेंटी-20 लीगमधून घ्यावी लागली माघार!

ट्वेंटी-20 लीगसाठी 162 खेळाडू अन् अधिकाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला समोर; सर्व झाले क्वारंटाईन

 

Web Title: CPL 2020:  Kieron Pollard to continue as TKR captain in CPL 2020; SQUADS FOR HERO CPL CONFIRMED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.