Join us

Ravindra Jadeja Special Six, IND vs SL 1st Test : Rockstar रविंद्र जाडेजाच्या ४ षटकारांपैकी हा सिक्सर ठरला 'स्पेशल'; जाणून घ्या कारण (Video)

रविंद्र जा़डेजाने १७ चौकार आणि ४ षटकारांसह केल्या नाबाद १७५ धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 16:00 IST

Open in App

Rockstar Ravindra Jadeja Special Six, IND vs SL 1st Test : टीम इंडियाने पहिल्या कसोटीत पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. रविंद्र जाडेजाच्या नाबाद १७५, रिषभ पंतच्या ९६, रविचंद्रन अश्विनच्या ६१ आणि हनुमा विहारीच्या ५८ धावांच्या बळावर भारताने ही धावसंख्या उभारली. श्रीलंकन गोलंदाजांची तुफान धुलाई केल्याने भारतीय फलंदाजांचं कौतुक झालं. रविंद्र जाडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत विक्रमी दी़डशतक ठोकलं. त्याने आपल्या डावात ४ षटकार खेचले, पण त्यापैकी एक षटकार खास ठरला.

भारताचा डाव घोषित करण्याच्या थोडा वेळ आधी जाडेजा मोहम्मद शमीसोबत फलंदाजी करत होता. त्यावेळी फिरकीपटू गोलंदाजाला पुढे येऊन रविंद्र जाडेजाने थेट सिक्स मारला. त्या गोलंदाजाच्या डोक्यावरून थेट चेंडू सीमारेषेपार गेला. हा षटकार या कारणासाठी महत्त्वाचा ठरला कारण त्या षटकाराने जाडेजाचं दीडशतक पूर्ण झालं. जाडेजाने १४६ धावांवर तो षटकार लगावला होता. त्यामुळे तो षटकार स्पेशल ठरला. पाहा तो षटकार-

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये ७व्या क्रमांकावर शतक झळकावणारा जाडेजा तिसरा भारतीय ठरला. याआधी कपिल देव यांनी १९८६मध्ये कानपूर कसोटीत १६३ धावा आणि महेंद्रसिंग धोनीने २००९ साली अहमदाबाद व मुंबई येथे अनुक्रमे ११० व नाबाद १०० धावा केल्या होत्या. तसेच रवींद्र जाडेजाने १६३ धावांचा टप्पा ओलांडताच त्याने कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला. भारताकडून ७ किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावरील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. कपिल देव यांनी १९८६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध १६३ धावा केल्या होत्या.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारवींद्र जडेजाविराट कोहलीरिषभ पंत
Open in App