Join us

IND vs AFG: रवींद्र जडेजाचा षटकारांचा पाऊस, एकदा Video पाहाच; आता अफगाणिस्तानची खैर नाही!

IND vs AFG: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricekt Team) यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना जिंकू शकलेलं नाही. भारतीय संघासाठी काहीच चांगलं होताना दिसत नाहीय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 15:49 IST

Open in App

IND vs AFG: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricekt Team) यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना जिंकू शकलेलं नाही. भारतीय संघासाठी काहीच चांगलं होताना दिसत नाहीय. सामना तर सोडाच पण कर्णधार विराट कोहली नाणेफेक देखील जिंकू शकलेला नाही. फलंदाज धावा करु शकत नाहीयत. तर गोलंदाजांकडूनही सुमार कामगिरी सुरू आहे. आता उर्वरित तीन सामने जिंकून भारतीय संघ लाज राखणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. भारतीय संघाची आज अफगाणिस्तान विरुद्धच लढत आहे. 

भारताच्या तुलनेत अफगाणिस्तानचा संघ कमकुवत मानला जात असला तरी टीम इंडियाचा सध्याचा खराब फॉर्म पाहता हा सामना देखील भारत सहजपणे जिंकेल असं ठामपणे कुणी सांगू शकत नाही. भारतीय संघाचे खेळाडू पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धचा सामना गमावल्यानंतर आता पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. संघाच्या खेळाडूंनी नेट्समध्ये चांगलाच घाम गाळला. रविंद्र जडेजाचा असाच एक नेट्समधील सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयनं ट्विट केला आहे. 

जडेजा नेट्समध्ये मोठे फटके मारण्याचा कसून सराव करताना दिसत आहे. जडेजानं नेट्समध्ये थ्रो डाऊन स्पेशालिस्टसमोर खणखणीत फटक्यांचा सराव केला. यासोबत रोहित शर्माच्या गोलंदाजीवरही फटकेबाजी केली. जडेजानं जोरदार सराव केलेला असला तरी आता अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 

जडेजानं ट्वेन्टी-२० वर्ल्डकपच्या गेल्या दोन्ही सामन्यात काही खास कामगिरी केलेली नाही. गोलंदाजीत त्याला एकही विकेट्स मिळालेली नाही. तर फलंदाजीतही तो फार चमक दाखवू शकलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध त्यानं केवळ १३ धावा केल्या, तर न्यूझीलंड विरुद्ध जडेजाने नाबाद २६ धावा केल्या. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१रवींद्र जडेजा
Open in App