Join us

IND vs ENG: रवींद्र जडेजाकडून टीम इंडियावर बोचरी टीका करणाऱ्या मायकेल वॉनला गिफ्ट, कारण आहे खास!

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन सातत्यानं टीम इंडियावर बोचरी टीका करतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 18:18 IST

Open in App

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन सातत्यानं टीम इंडियावर बोचरी टीका करतोय. भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतही वॉन आणि भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफर यांच्यात सोशल मीडियावर जुंपत आहेच. अशात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यानं टीम इंडियाची जर्सी इंग्लंडच्या माजी कर्णधाराला गिफ्ट म्हणून दिली. जडेजानं या जर्सीवर टीम इंडियातील सर्व सदस्यांची स्वाक्षरी आहे. ( Indian all-rounder Ravindra Jadeja gifted a Test jersey signed by all Indian team members currently touring England to Michael Vaughan for a charitable purpose). 

मायकेल वॉन चॅरिटीसाठी जडेजानं ही जर्सी दिली आहे. वॉननं या जर्सीचा लिलाव करून चॅरिटीसाठी भरपूर निधी गोळा होईल, अशी इस्टा पोस्ट लिहिली आहे. 

 दरम्यान, लिड्स कसोटीचा निकाल लागल्यानंतर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यानं हॉस्पिटल गाठले. त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीतून ही गोष्ट समोर आली अन् आता चाहत्यांची चिंता वाढली आहे. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सराव करताना रवींद्र जडेजाचा पाय दुखावला होता आणि काही काळासाठी त्यानं मैदान सोडले होते. तिसऱ्या कसोटीत जडेजानं २५ चेंडूंत ३० धावा केल्या. सामना संपल्यानंतर जडेजा त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीचे स्कॅन करण्यासाठी गेला होता. त्यानं हा फोटो पोस्ट केला. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप BCCIनं सांगितलं नाही. तो चौथ्या कसोटीत खेळणार याची शक्यता कमी आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवींद्र जडेजा
Open in App