Join us  

सर जी तुस्सी ग्रेट हो!; रवींद्र जडेजानं लॉकडाऊनमध्ये केली मोठी समाजसेवा, बहिणीनं जगासमोर आणलं त्याचं कार्य!

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravinda Jadeja) याची फटकेबाजी पाहून तो किती निर्दयी आहे, असे RCBच्या फॉलोअर्सना नक्की वाटले असेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 8:59 PM

Open in App

 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravinda Jadeja) याची फटकेबाजी पाहून तो किती निर्दयी आहे, असे RCBच्या फॉलोअर्सना नक्की वाटले असेल. २८ चेंडू नाबाद ६२ धावा, ४-१-१३-३ अशी गोलंदाजी अन् एक अफलातून रन आऊट, अशी दमदार कामगिरी जडेजानं केली. खरं तर त्याला सर जडेजाच म्हणायला हवं. मैदानावर दमदार कामगिरी करणाऱ्या जडेजानं लॉकडाऊनच्या काळात मोठी समाजसेवा केली आहे आणि याची चुणूकही कोणाला होऊ दिली नाही. त्याचं हे समाजकार्य अजूनही सुरू आहे आणि त्याची बहिण नयना हिनं जड्डूचं कार्य जगासमोर आणलं आहे. भारतीय खेळाडूंचंही कोरोना लढ्यात मोठं योगदान; सचिन, विराट यांच्यासह अनेकांनी लावला हातभार!

जडेजानं लॉकडाऊनच्या काळात गरजूंना अन्न पोहोचवण्यापासून ते कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे ते त्यांचा उपचाराचा खर्च उचलण्याचं काम केलं आहे. सौराष्ट्रच्या स्टार क्रिकेटपटूची बहिण नयना हिनं 'एबीपी लाईव्ह'शी बोलताना सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात आम्ही राजकोटमधील अनेक गरजूंच्या घरी रेशन देण्याची व्यवस्था केली. जड्डू स्वतःहून जात नाही. त्याला पाहण्यासाठी सर्वत्र गर्दी जमते म्हणून तो कुठेही जाऊ शकत नाही. आम्ही आणि आमच्या टीमने घरोघरी अन्नाच्या वस्तू पोहचवल्या.'' चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा आनंद ठरला क्षणिक; CSKच्या प्रमुख सदस्याचं निधन

कोरोना संक्रमणाची दुसरी लाट भारताला आली आहे. बेड नाहीत, पुरेसा ऑक्सिजन पुरवठा नाही. अशात पुन्हा एकदा जडेजा व नयना मदतीसाठी पुढे आले आहेत. ''यावेळी समस्या थोडी वेगळी आहे. लोक काम करत असतील. परंतु कोरोना रुग्णांना उपचार घेता येत नाही, कुठेही बेड नाहीत, ऑक्सिजन किंवा औषध नाहीत, ही बातमी मिळताच आम्ही मदतीसाठी धावून जातोय. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून ते ऑक्सिजनच्या शोधापर्यंत आम्ही मदत करतोय,'' असे नयनानं सांगितले. Pat Cummins चे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठं योगदान; ऑक्सिजन खरेदीसाठी PM Cares Fund ला दिले ३० लाख!

राजकोट शहराच्या मध्यभागी जडेजाचे 'जड्डूस फूड फील्ड' हे रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये २५ कर्मचारी कामाला आहेत. त्यातील बहुतेक जण घरी गेले. नयनानं सांगितलं की, ''कुणाचे घर उत्तराखंडमध्ये आहे, कुणाचे नेपाळमध्ये. या सर्वांना जडेजा प्रत्येक महिन्याला पैसे पोहोचवत आहे. जड्डूला प्रसिद्धी नको आहे. तो शांतपणे करतो.'' 

टॅग्स :आयपीएल २०२१रवींद्र जडेजाकोरोना वायरस बातम्या