चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा आनंद ठरला क्षणिक; CSKच्या प्रमुख सदस्याचं निधन

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघानं रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघावर ६९ धावा राखून दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 06:18 PM2021-04-26T18:18:55+5:302021-04-26T18:19:13+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Chennai Super Kings chairman L Sabaretnam passes away | चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा आनंद ठरला क्षणिक; CSKच्या प्रमुख सदस्याचं निधन

चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा आनंद ठरला क्षणिक; CSKच्या प्रमुख सदस्याचं निधन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघानं रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघावर ६९ धावा राखून दणदणीत विजय मिळवला. पण, त्यांचा हा विजयाचा आनंद क्षणिक ठरला अन् त्यांच्यासाठी एक दुःखद बातमी समोर आली. चेन्नई सुपर किंग्सचे चेअरमन व डायरेक्टर एल सबरेत्नाम यांचे रविवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

त्यांच्या मागे दोन मुली व दोन मुलं असा परिवार आहे.  चेट्टिनाद सीमेंट कॉरपोरेशनमध्ये कार्यकारी संचालक म्हणून बरीच वर्ष कार्यभार सांभाळला आणि ते चेन्नई पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑयल कॉरपोरेशनचे देखील संचालक होते. मद्रास चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीचे ते अध्यक्ष होते. इंडियन सिमेंट लिमिटेडमध्ये ते सल्लागार म्हणून रुजू झाले आणि त्यानंतर त्यांनी चेन्नई सुपर किंग्सची सूत्रं हाती घेतली.  

रवींद्र जडेजाचा प्रहार, आरसीबी गपगार!
२८ चेंडू नाबाद ६२ धावा, ४-१-१३-३ अशी गोलंदाजी अन् एक अफलातून रन आऊट... आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) असा सामना नव्हे तर रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) Vs Royal Challengers असा सामना रंगला. महेंद्रसिंग धोनीनं प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय जडेजानं २०व्या षटकात ३६ धावा चोपून सार्थ ठरवला, त्यानंतर गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात जडेजानं एकहाती RCBला नाचवलं. इम्रान ताहीरनंही त्याची निवड योग्य ठरवताना दोन विकेट्स घेतल्या. विराट कोहलीच्या RCBवर एकटा रवींद्र जडेजा भारी पडला. विराट कोहलीच्या संघाची अपराजित मालिका आज खंडीत झाली. CSKच्या ४ बाद १९१ धावांचा पाठलाग करताना RCBनं ९ बाद १२२ धावा केल्या. 
 

Web Title: IPL 2021 : Chennai Super Kings chairman L Sabaretnam passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.