Ravindra Jadeja Half Century IND vs ENG 3rd Test : इंग्लड विरुद्धच्या लॉर्ड्सच्या मैदानात रवींद्र जडेजाच्या भात्यातून आणखी एक अर्धशतक आल्याचे पाहायला मिळाले. धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया अडचणीत असताना दबावात जबाबदारी खांद्यावर घेत जडेजानं सर्वोत्तम खेळी करुन दाखवली. क्रिकेटच्या मैदानात अर्धशतकानंतर तो 'तलवारबाजी'सह आनंद साजरा करतो. पण यावेळी त्याने असं सेलिब्रेशन करणं टाळलं. कारण फिफ्टीचा डाव साधल्यानंतर त्याच्या नजरा या टीम इंडियासाठी अवघड झालेला सामना जिंकून देण्याच्या होत्या. तो शेवटपर्यंत टिकला. पण शेवटी ते साध्य झालं नाही. सिराजची विकेट पडली अन् टीम इंडियानं २२ धावांनी हा सामना गमावला.
इंग्लंडच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा बॅटर
रवींद्र जडेजानं सलग चौथ्यांदा इंग्लंडच्या मैदानात ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा डाव साधला आहे. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरलाय. या यादीत रिषभ पंत अव्वलस्थानी आहे. पंतनं २०२१ ते २०२५ या कालावधीत इंग्लंडमध्ये सलग पाच वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी
रवींद्र जडेजानं लॉर्ड्सच्या मैदानातील दुसऱ्या डावातील अर्धशतकी खेळीसह भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. गांगुलीनं २००२ च्या दौऱ्यात चार वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. जड्डूनं लॉर्ड्सच्या मैदानातील दोन्ही डावातील अर्धशतकाशिवाय बर्मिंगमच्या एजबॅस्टनच्या मैदानातील दोन्ही डावात अर्धशतक झळकावले होते.
इंग्लंडच्या मैदानात सलग चार वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज
- ५ रिषभ पंत (२०२१-२५)
- ४ सौरव गांगुली (२००२)
- ४* रवींद्र जडेजा (२०२५)
Web Title: Ravindra Jadeja
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.