Join us  

Asia Cup स्पर्धेत स्थान न मिळालेल्या आर अश्विन संतापला; IPL, तिलक, सूर्याबाबत म्हणाला... 

Asia Cup 2023 Indian Team Squad : आशिया कप २०२३ साठी  भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 9:31 PM

Open in App

Asia Cup 2023 Indian Team Squad : आशिया कप २०२३ साठी  भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. युझवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन ( R Ashwin) या खेळाडूंच्या नावाचा संघात समावेश  नसल्याने, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, वन डे सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी करूनही सूर्यकुमार यादवला मुख्य संघात स्थान मिळाले आणि तिलक वर्माचा संघात समावेश करण्यात आला, परंतु संजू सॅमसनला राखीव ठेवण्यात आले आहे.

चाहत्यांनी तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, अश्विनने दोघांनाही सपोर्ट करत ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, '' निवड समिती जे करत आहेत ते योग्य आहे. भारतासारख्या मोठ्या देशात, जेव्हा तुम्ही संघ निवडता तेव्हा ते खूप कठीण काम असते. यादरम्यान अनेक महत्त्वाच्या खेळाडूंनाही संघात स्थान मिळत नाही. जर तुमच्या आवडत्या खेळाडूला संघात स्थान मिळाले नाही, तर याचा अर्थ तुम्ही इतरांना निराश कराल, असे नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे. संघातील कोणत्याही खेळाडूच्या स्थानावर शंका घेतली जाऊ नये.''

तिलकचे समर्थन करताना अश्विन म्हणाला, ''आयर्लंड दौऱ्यात तिलकने जास्त धावा केल्या नाहीत, पण त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली. पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करण्याचा त्याचा मानस असतो. तिलक अजून तरुण आहेत आणि कसं खेळायचं हे याबाबत तो अगदी स्पष्ट आहे. त्यामुळेच त्याचा भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.''

संजू सॅमसनच्या नावावर सुरू असलेल्या चर्चेवरही अश्विनने आपली बाजू मांडली. आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याने हा संपूर्ण वाद आयपीएलमुळे झाल्याचे अश्विनचे मत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूंना भारतीय संघात पाहायचे आहे. 

टॅग्स :आर अश्विनएशिया कप 2022
Open in App