मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाच्या क्षमतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यात मुख्य प्रशिक्षक आणि त्यांचा सहयोगी स्टाफही टीकेच्या केंद्रस्थानी आहेत. रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक स्टाफचा करार वर्ल्ड कपनंतर संपुष्टात आला आहे, फक्त त्यांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचवेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मंगळवारी मुख्य प्रशिक्षकांसह अन्य महत्त्वांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नियमानुसार शास्त्रीसह सध्या कार्यरत असलेले साहाय्यक स्टाफही पुन्हा अर्ज करू शकतात. पण, शास्त्रींची निवड न झाल्यास कोण असू शकतो भारतीय संघाचा पुढचा प्रशिक्षक ?
बीसीसीआयमध्ये मेगाभरती; मुख्य प्रशिक्षकासह महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने ठेवल्या 'या' तीन अटी
टॉम मूडीः विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला उंचीवर नेण्याची क्षमता टॉम मूडी यांच्याकडे आहे. ते इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सनरायजर्स हैदराबादचे ( 2012 पासून) प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादनं 2015मध्ये जेतेपद पटकावले होते.
ट्रॅव्हर बायलीसः इंग्लंड संघाचे सध्याचे प्रशिक्षक ट्रॅव्हर बायलीस यांच्या करारात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भारतीय संघाला त्यांच्यापेक्षा योग्य पर्याय मिळूच शकत नाही. त्यांनी 2015 मध्ये इंग्लंडच्या प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानासह पहिलेवहिले वर्ल्ड कप जेतेपदही पटकावले.