Join us

सचिनचा 'मास्टर स्ट्रोक'; अर्जुनला 'शास्त्री'बुवांची खास(गी) शिकवणी

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला सध्या शिकवणी देत आहेत ते भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 13:47 IST

Open in App

लंडन : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला सध्या शिकवणी देत आहेत ते भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री. हे सारं ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कदाचित या गोष्टीवर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. भारताच्या संपूर्ण संघाला प्रशिक्षण देणारे भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्री आता अर्जुनला वेळ काढून काही मोलाचे सल्ले देत आहेत.

या गोष्टीवर तुम्हाला अजूनही विश्वास बसला नसेल. तर मग एक काम करा बीसीसीआयच्या ट्विटर हँडलवर जा, कारण बीसीसीआयने शास्त्री अर्जुनला मोलाचे सल्ले देत असल्याचे फोटो ट्विट केले आहेत.भारतीय संघ लंडनला दाखल झाला आहे. लंडनहून भारतीय संघ आयर्लंडला ट्वेन्टी-20 सामने खेळायला जाणार आहे. यादरम्यान शास्त्री यांना थोडा वेळ मिळाला आणि त्यांनी अर्जुनला काही मौलिक सल्ले दिले. अर्जुन सध्या भारतीय ' अ ' संघात आहे.

टॅग्स :रवी शास्त्रीअर्जुन तेंडुलकरक्रिकेट