Join us

रवी शास्त्रींचा रवीना टंडनबरोबरचा फोटो होतोय ट्रोल, एक क्रिकेटपटू तर म्हणाला...

रवी शास्त्री आणि बॉलीवूडचा जवळचा संबंध आहे, असे म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी शास्त्री आणि बॉलीवूडची अभिनेत्री अमृता सिंग यांच्यामध्ये अफेअर असल्याची चर्चा होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 19:09 IST

Open in App
ठळक मुद्देकाही महिन्यांपूर्वी शास्त्री एका सुंदरीला डेटिंग करत असल्याचेही वृत्त प्रसारीत झाले होते.

मुंबई : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बॉलीवूडमधील अभिनेत्री रवीना टंडन यांचा एक फोटो आज पाहायला मिळाला. हा फोटो आता ट्रोल व्हायला लागला आहे. नेमका हा फोटो आहे तरी कुठला...

रवी शास्त्री आणि बॉलीवूडचा जवळचा संबंध आहे, असे म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी शास्त्री आणि बॉलीवूडची अभिनेत्री अमृता सिंग यांच्यामध्ये अफेअर असल्याची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी शास्त्री एका सुंदरीला डेटिंग करत असल्याचेही वृत्त प्रसारीत झाले होते. पण आता थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी ते कोणत्या सुंदरीबरोबर आहेत, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे.

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी शास्त्री हे अलिबागला गेले आहेत. सध्याच्या घडीला भारतीय संघाचे सामने नाहीत. त्यामुळे संघाला विश्रांती मिळालेली आहे. त्यामुळे आता थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी शास्त्री यांनी थेट अलिबाग गाठल्याचे समजत आहे.

या फोटोमध्ये रवी शास्त्री यांच्याबरोबर आहे बॉलीवूड किंग शाहरुख खान. यंदाचा थर्टी फर्स्ट हे दोघे एकत्र साजरा करणार असल्याचेही समजत आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर उद्योगपती गौतम सिंघानिया आहेत. या फोटोमध्ये रवी शास्त्री एका सुंदरीच्या खांद्यावर हात ठेवल्याचे पाहायला मिळाले आहे. ती सुंदरी रवीना टंडन आहे.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने हा फोटो ट्रोल केला आहे. त्याचबरोबर वॉनने शास्त्री यांच्या फोटोवर कमेंटही केली आहे. हॅप्पी न्यू इअर शास्त्री, असे म्हणत वॉनने शास्त्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :रवी शास्त्रीरवीना टंडनशाहरुख खान