मुंबई : मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या फोटोत दिसणारी व्यक्ती ही हुबेहूब भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासारखी दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस पडत आहे. शास्त्री गुरूजींवर जोक्स करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे.
ती व्यक्ती शास्त्री नाही, परंतु प्रथमदर्शनी ते शास्त्री असल्याचेच भासते. मुंबईच्या लोकलमध्ये हा फोटो काढण्यात आलेला आहे. त्यात ती व्यक्ती खिडकीजवळ बसून कसला तरी विचार करताना दिसत आहे.
शास्त्री सध्या भारतीय संघाबरोबर लखनौमध्ये आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरा सामना आज येथे होणार आहे.