Join us

Ravi Shastri On Virat Kohli: कोहलीला वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन डच्चू दिल्यानंतर रवि शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Ravi Shastri On Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहलीला भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्याच्या मुद्द्यावर अखेर आपलं मौन सोडलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 19:04 IST

Open in App

Ravi Shastri On Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहलीला भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्याच्या मुद्द्यावर अखेर आपलं मौन सोडलं आहे. निवड समितीनं घेतलेला निर्णय विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांसाठी चांगला ठरेल, असं वक्तव्य रवि शास्त्री यांनी केलं आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारतीय संघ रवाना होण्याआधीच विराट कोहलीला भारतीय एकदिवसी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे. रोहित शर्मा आता टीम इंडियाच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व करणार आहे. 

कर्णधारपदावरुन सुरू झालेल्या वादावर बोलत असताना रवि शास्त्री म्हणाले की, पुढे जाण्यासाठी हाच योग्य मार्ग ठरू शकतो. दोघांसाठी हे खरंतर चांगलं ठरेल. कारण कोरोनामुळे बायो-बबलच्या नियमांचं पालन करत कोणा एकावर तीन प्रकारात संघाचं नेतृत्त्व सांभाळणं सोपं काम नाही. विराट कोहलीला आता पूर्णपणे कसोटी क्रिकेटकडे लक्ष देऊन काम करता येईल. एक खेळाडू म्हणून त्याच्याकडे आता जास्तीत जास्त ५ ते ६ वर्ष शिल्लक आहेत. अशात त्याला आता स्वत:च्या खेळावर अधिक लक्ष केंद्रीत करता येईल, असं रवि शास्त्री म्हणाले. 

कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर उडाली होती खळबळविराट कोहलीनं ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडलं आहे. पण ज्यावेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली त्यात कोहलीकडून एकदिवसीय संघाचं नेतृत्त्व देखील काढून घेण्यात आलं आहे. यानंतरच्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं एकदिवसीय संघासाठी कर्णधारपदी कायम राहण्याची इच्छा होती. पण निवड समितीनं त्यांचा निर्णय जाहीर केला आहे, असं म्हणत खळबळ उडवून दिली होती.

टॅग्स :रवी शास्त्रीविराट कोहली
Open in App