महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर भडकले रवी शास्त्री, म्हणाले एकदाचा संपवा तो विषय

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवरून मोठं विधान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 11:24 IST2019-10-26T11:24:00+5:302019-10-26T11:24:58+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ravi Shastri slams MS Dhoni's critics again, says 'half the guys commenting can’t even tie their shoelaces' | महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर भडकले रवी शास्त्री, म्हणाले एकदाचा संपवा तो विषय

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर भडकले रवी शास्त्री, म्हणाले एकदाचा संपवा तो विषय

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवरून मोठं विधान केलं आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर धोनीनं विश्रांती घेणं पसंत केले. सुरुवातीला त्यानं बीसीसीआयकडे दोन महिन्यांची विश्रांती मागितली होती, परंतु त्यात त्यानं नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे तो कमबॅक करेल की नाही, याची धाकधुक चाहत्यांच्या मनाला लागली आहे.  

''15 वर्ष देशासाठी क्रिकेट खेळणाऱ्या धोनीला कधी निवृत्ती घ्यायची याची जाण आहे,'' असे शास्त्री म्हणाले. भारतीय क्रिकेटसाठी धोनीनं दिलेलं योगदान एवढं आहे की, निवृत्तीचा निर्णयाचा अधिकार त्याला स्वतःला आहे. धोनीच्या बाबतित शास्त्रींचं मत हे निवड समितीच्या मताशी विसंगत आहे. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी  सांगितले की, " विश्वचषकानंतर आमचे विचार स्पष्ट झाले आहेत. आम्ही युवा यष्टीरक्षकांना जास्त संधी देणार आहोत. धोनीच्या मनातही हीच गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही धोनीऐवजी युवा यष्टीरक्षकांना यापुढे पसंती देणार आहोत."

पण, शास्त्री म्हणातात की,''15 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर केव्हा काय करायचे याची जाण धोनीला नसेल का? जेव्हा त्यानं कसोटीतून निवृत्ती घेतली होती, तेव्हा त्यानं काय सांगितलं होतं? हेच की वृद्धीमान साहाकडे जबाबदारी सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे. जेव्हा संघाच्या हिताची गोष्ट असते तेव्हा धोनी नेहमी आपले विचार व कल्पना घेऊन तत्पर असतो. रांची कसोटीतही ते पाहायला मिळाले. कधी निवृत्त व्हायचे याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार धोनीकडे आहे. आता त्यावर जास्त चर्चा करू नका.''

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी मैदानावर उतरलेला नाही. त्यानं वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेश मालिकेतून माघार घेतली आहे. शास्त्री म्हणाले,''धोनीनं देशाला अनेकदा यश मिळवून दिले आहे. लोकांना त्याच्या निवृत्तीची एवढी घाई का झाली आहे? त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी दुसरा मुद्दाच नसावा. त्यांनाही हे ठावूक आहे की धोनी इतक्यात क्रिकेटपासून दूर जाणार नाही.'' 

Web Title: Ravi Shastri slams MS Dhoni's critics again, says 'half the guys commenting can’t even tie their shoelaces'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.