Join us

रवी शास्त्रींनी 'ही' एकच गोष्ट सांगितली आणि प्रशिक्षकपदाची माळ गळ्यात पडली

शास्त्री यांनी मुलाखत आत्मविश्वासपूर्ण दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर काही उदाहरणेही शास्त्री यांनी सल्लागार समितीला दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 21:43 IST

Open in App

मुंबई :  भारताच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. आता २०२१ सालापर्यंत शास्त्री हे भारताच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील. पण शास्त्रींचीच निवड प्रशिक्षकपदासाठी का करण्यात आली, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या गोष्टीचे उत्तर बीसीसीआयमधील सूत्रांनी दिले आहे. आपल्या मुलाखतीमध्ये शास्त्री यांनी सल्लागार समितीला फक्त एकच गोष्ट सांगितली आणि त्यांची निवड झाली, असे म्हटले जात आहे. पण ही गोष्ट नेमकी होती तरी काय, ती आता जाणून घेऊ या...

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावर अखेर रवी शास्त्रीच यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड केली. या पदासाठी सहा जणांमध्ये चुरस रंगली होती, परंतु शास्त्रींनी बाजी मारली. 

मुलाखतीमध्ये काही प्रश्न या उमेदवारांना विचारले गेले होते. त्याबरोबर तुम्ही या पदासाठी कसे लायक आहात, याचे उत्तरही या उमेदवारांना द्यायचे होते. यावेळी अन्य उमेदवारांपेक्षा शास्त्री हे फक्त एकाच गोष्टीमुळे सरस ठरल्याचे म्हटले जात आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन यांच्यासह 2007 सालच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप  विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनीही या पदासाठी अर्ज केले होते. शास्त्री भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची मुलाखत व्हिडीओ कॉन्फरन्सने घेण्यात आली. त्यांनी सर्वात शेवटी मुलाखत दिली. त्यांनी ही मुलाखत आत्मविश्वासपूर्ण दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर काही उदाहरणेही शास्त्री यांनी सल्लागार समितीला दिली. पण ती एक गोष्ट नेमकी होती तरी काय, ज्यामुळे त्यांची निवड प्रशिक्षकपदी करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्री यांनी स्काइपद्वारे आपली मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपले ध्येय अजूनही यशस्वी पूर्ण झालेले नाही, हे त्यांनी सांगितले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. आता यापुढे २०२० आणि २०२१ साली विश्वचषक होणार आहे. हे विश्वचषक माझ्या डोळ्यापुढे आहेत, असे शास्त्री यांनी सल्लागार समितीला सांगितले.

टॅग्स :रवी शास्त्रीबीसीसीआय