Join us  

खळबळजनक... रवी शास्त्री आहेत बालिश, गौतम गंभीरने डागली तोफ

रवी शास्त्री हे बालिश असून ते अजूनही परीपक्व झालेले नाहीत, असे गंभीरचे मत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 5:44 PM

Open in App
ठळक मुद्देशास्त्री यांचे क्रिकेटमधील कर्तृत्व काय, याचा विचार करायला हवा.त्यांचे भारतीय क्रिकेटला भरीव असे योगदान नाही.ज्या माणसांचे कर्तृत्व नसते तेच असे वक्तव्य करत असतात.

नवी दिल्ली : निवृत्ती पत्करल्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर तोफ डागली आहे. रवी शास्त्री हे बालिश असून ते अजूनही परीपक्व झालेले नाहीत, असे गंभीरचे मत आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये गंभीरने हे वक्तव्य केले आहे.

सध्याच्या घडीला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारताने पहिला कसोटी सामना ३१ धावांनी जिंकला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पहिला कसोटी सामना जिंकणार हा पहिला भारतीय संघ ठरला आहे. पण तरीही गंभीरने शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

गंभीर म्हणाला की, " शास्त्री यांचे क्रिकेटमधील कर्तृत्व काय, याचा विचार करायला हवा. जेव्हा जेव्हा भारतीय संघाने परदेशात सामने जिंकले तेव्हा ते त्या संघामध्ये नव्हते. ऑस्ट्रेलियामधील एकाच स्पर्धेत ते चमकले. त्यामुळे त्यांचे भारतीय क्रिकेटला भरीव असे योगदान नाही. "

गंभीर पुढे म्हणाला की, " हा भारतीय संघ सर्वोत्तम असल्याचे शास्त्री सातत्याने म्हणत आहेत. यावरून शास्त्री अपरीपक्व आहेत, हे समजते. त्याचबरोबर त्यांचा बालिशपणाही समोर आला आहे. एखादा संघ जेव्हा ४-१ अशी मालिका जिंकतो तेव्हाही तो सर्वोत्तम ठरू शकत नाही. कारण या मालिकेनंतर त्यांची कामगिरी कशी होते, हे महत्वाचे असते. शास्त्री मुख्य प्रशिक्षक असताना भारताने परदेशात किती मालिका जिंकल्या आहेत, याचे उत्तर मिळत नाही. ज्या माणसांचे कर्तृत्व नसते तेच असे वक्तव्य करत असतात."

टॅग्स :गौतम गंभीररवी शास्त्री