Join us  

सचिन, कोहलीला मागे टाकून अश्विन द्रविडशी बरोबरी करण्यासाठी सज्ज

अश्विन हा एक फिरकीपटू आहे, त्याने सचिन आणि कोहलीला कधी मागे टाकले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचबरोबर तो द्रविडशी कशी बरोबरी करू शकतो, याचाही अंदाज तुम्हाला येत असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 9:16 PM

Open in App
ठळक मुद्देभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ४ ऑक्टोबरपासून राजकोट येथे रंगणार आहे.

नवी दिल्ली : भारताच्या आर. अश्विनने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहली यांना मागे टाकले, तर आता तो माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडशी बरोबरी करणार, हे वाचल्यावर तुम्हाला धक्का बसेल. अश्विन हा एक फिरकीपटू आहे, त्याने सचिन आणि कोहलीला कधी मागे टाकले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचबरोबर तो द्रविडशी कशी बरोबरी करू शकतो, याचाही अंदाज तुम्हाला येत असेल. पण या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ४ ऑक्टोबरपासून राजकोट येथे रंगणार आहे. या सामन्यात अश्विनला द्रविडशी बरोबरी करण्याची संधी मिळू शकते.

आतापर्यंत अश्विनने ६२ कसोटी सामने खेळले आहेत. या ६२ सामन्यांमध्ये त्याने चार शतके लगावली आहे. अश्विनने ही चारही शतके वेस्ट इंडिजविरुद्ध लगावली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध ९ सामन्यांत त्याने ५६.६६ च्या सरासरीने 510 धावा केल्या आहेत. सचिनला वेस्ट इंडिजविरुद्ध तीन आणि कोहलीने एक शतक लगावले आहे, तर द्रविडच्या नावावर पाच शतके आहेत. त्यामुळे जर अश्विनने या सामन्यात शतक लगावले तर तो द्रविडच्या पाच शतकांची बरोबरी करू शकतो. 

टॅग्स :आर अश्विनसचिन तेंडुलकरराहूल द्रविडविराट कोहली