Join us

Video : MS Dhoniच्या 'हॅलिकॉप्टर शॉट'ची कॉपी करणं सोपी गोष्ट नाही; राशिद खानचा झाला पोपट

स्ट्राकर्सच्या डावातील १९व्या षटकात फलंदाजीला आलेल्या राशिदनं पहिल्याच चेंडूवर आक्रमक फटका मारला अन्..

By स्वदेश घाणेकर | Updated: January 10, 2021 10:47 IST

Open in App

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेची चर्चा सुरू असताना दुसरीकडे बिग बॅश लीगवरही सर्वांचे लक्ष वेधले आहे. BBL 10मध्ये अॅडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध रेनेगड्स संघातील सामन्यात राशिद खाननं ( Rashid Khan) मारलेला फटका चर्चेत आहे. स्ट्रायकर्सनं ७ बाद १२२ धावा केल्या. स्ट्रायकर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राशिदनं या सामन्यात MS Dhoniचा हॅलिकॉप्टर शॉट मारला. पण, त्यावरून कॉमेंटेटर्सना हसू आवरले नाही.

स्ट्राकर्सच्या डावातील १९व्या षटकात फलंदाजीला आलेल्या राशिदनं पहिल्याच चेंडूवर आक्रमक फटका मारला. त्यानं लेग साइडच्या दिशेनं हॅलिकॉप्टर शॉट मारला, परंतु त्याचा जोर कमी पडला आणि राशिदला गोल्डन डकवर झेलबाद होऊन माघारी परतावे लागले. हे पाहून समालोचकालाही हसू आवरले नाही.   गोलंदाजीत मात्र राशिदनं ३ षटकांत अवघ्या १४ धावा देत दोन विकेट्स घेतल्या.

टॅग्स :बिग बॅश लीगटी-20 क्रिकेटमहेंद्रसिंग धोनी