Join us

रशिद खानने घेतलाय भारतीय फलंदाजांचा धसका

यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना रशिद खानने चमकदार कामगिरी केली होती. दिग्गज फलंदाजांना आयपीएलमध्ये त्याने आपल्या तालावर नाचवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 13:51 IST

Open in App
ठळक मुद्देसध्याच्या घडीला रशिदने मात्र भारतीय फलंदाजांचा धसका घेतला आहे आणि त्याला कारण आहे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना.

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना रशिद खानने चमकदार कामगिरी केली होती. दिग्गज फलंदाजांना आयपीएलमध्ये त्याने आपल्या तालावर नाचवले होते. पण सध्याच्या घडीला रशिदने मात्र भारतीय फलंदाजांचा धसका घेतला आहे आणि त्याला कारण आहे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये 14 जूनला बँगलोरमध्ये कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानसाठी हा पहिलाच कसोटी सामना असेल. सध्याच्या घडीला भारतीय संघ हा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्यामुळेच भारतीय फलंदाजांचे दडपण रशिदने घेतल्याचे म्हटले जात आहे.

याबाबत रशिद म्हणाला की, " ट्वेन्टी-20 आणि कसोटी, हे दोन्ही क्रिकेटचे दोन भिन्न प्रकार आहेत. आयपीएलमध्ये माझ्याकडून चांगली गोलंदाजी झाली. पण कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यात खरे कसब असते. भारत अव्वल स्थानावर आहे आणि त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे भारताच्या फलंदाजांपुढे गोलंदाजी करणे हे माझ्यापुढे फार मोठे आव्हान असेल. " 

टॅग्स :आयपीएलसनरायझर्स हैदराबादक्रिकेट