Rashid Khan or Jethalal, IPL 2022: हा नक्की कोण.. राशिद खान की जेठालाल? चाहत्याच्या फोटोवर Gujarat Titans चं भन्नाट उत्तर

राशिद खानने गुजरातच्या संघाकडून यंदा दमदार कामगिरी केली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 08:10 PM2022-05-21T20:10:00+5:302022-05-21T20:11:36+5:30

whatsapp join usJoin us
Rashid Khan copying Jethalal Fan Tweet goes viral Gujarat Titans give comedy Reply IPL 2022 | Rashid Khan or Jethalal, IPL 2022: हा नक्की कोण.. राशिद खान की जेठालाल? चाहत्याच्या फोटोवर Gujarat Titans चं भन्नाट उत्तर

Rashid Khan or Jethalal, IPL 2022: हा नक्की कोण.. राशिद खान की जेठालाल? चाहत्याच्या फोटोवर Gujarat Titans चं भन्नाट उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rashid Khan or Jethalal, IPL 2022: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाविरूद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (RCB) विजय मिळवला. गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १६८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने ७३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी गुजरातच्या संघाकडून हार्दिक पांड्यानेही अर्धशतक ठोकले होते. तर उपकर्णधार राशिद खानने गोलंदाजी करताना विराट कोहलीचा बळी टिपला. या सामन्यातील राशिद खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर गुजरात टायटन्सच्या अँडमिनने भन्नाट रिप्लाय दिला.

हार्दिकचे अर्धशतक आणि इतर फलंदाजांची दमदार कामगिरी याच्या जोरावर गुजरातने २० षटकांत १६८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राशिद खानने २ बळी टिपले. विराट कोहलीने त्या सामन्यात राशिदला दोन षटकार लगावले, पण अखेरीस राशिद खाननेच विराट कोहलीला बाद केले. या सामन्यात राशिद गोलंदाजी करत असताना त्याचा एक फोटो व्हायरल झाला. त्याची फोटोतील अँक्शन प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ( Tarak Mehta Ka Ooltah Chashmah ) मधील जेठालालशी मिळतीजुळती होती.

एका युजरने यासंबंधीचा फोटो पोस्ट केला. त्यानंतर गुजरात अँडमिननेही त्यावर धमाल रिप्लाय दिला. आमच्या संघातील कोणत्याही खेळाडूचा इतर पात्रांशी संबंध असल्याचे वाटलं तर तो निव्वळ योगायोग समजावा, असे मजेशीर उत्तर त्यांनी दिले.

दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीला सामनावीराचा किताब देऊन गौरविण्यात आले. सामन्यानंतर हा किताब स्वीकारताना विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यासोबतच एक मजेशीर विधानही केले. "मी चांगली फलंदाजी करू शकतो हे मला माहिती होतं. आजचा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा होता. पण मी गेले काही दिवस खूपच निराश होतो, कारण माझ्या संघासाठी मला फार काही करता आलं नाही याची मला खंत होती. पण अखेर या सामन्यात मी स्वत:च्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी चांगली खेळी करू शकलो याचं मला समाधान आहे", असे विराट म्हणाला.

Web Title: Rashid Khan copying Jethalal Fan Tweet goes viral Gujarat Titans give comedy Reply IPL 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.