Join us

बुमराहच्या प्रेमात बॉलिवूडची ही अभिनेत्री झाली 'क्लीन बोल्ड'

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते तसे जुने आहे. आतापर्यंत अनेक खेळांडू बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या वर्षाखेर लग्नाच्या बेडीत अडकले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 14:06 IST

Open in App

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते तसे जुने आहे. आतापर्यंत अनेक खेळांडू बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या वर्षाखेर लग्नाच्या बेडीत अडकले. आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री क्रिकेटरच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाल्याचे वृत्त आहे. होय, ही अभिनेत्री भारतीय टीमच्या एका खेळाडूवर अशी काही भाळलीयं की, त्याची तारीफ करताना ती जराही थकत नाही.

साऊथ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री राशी खन्ना बुमराहाच्या प्रेमात पडली आहे. बॉलिवूडमध्ये राशी खन्ना हे नाव फार परिचित नाही. जॉन अब्राहनसोबत मद्रास कॅफे या चित्रपटात ती झळकली होती. पण साऊथ इंडस्ट्रीत ते एक मोठे नाव आहे. जिल, हायपर, बंगाल टायगर, शिवम आणि सन ऑफ सथ्यमूर्ती2 मध्ये तिने काम केले आहे. हीच राशी खन्ना  यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर भाळली आहे. मी केवळ बुमराचची मॅच बघते. बुमराहसाठीचं मॅच बघते, असे म्हटले तरी चालेल, असे राशी खन्ना म्हणाली. 

सोशल मीडियावरही राशी अनेकदा जसप्रीत बुमराहची प्रशंसा करताना दिसते. राशीने अलीकडे एका मुलाखतीत बुमराहबद्दलच्या तिच्या भावना बोलून दाखवल्या. अद्याप बुमराहने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता विराट, भज्जी, युवीसारखाच बुमराहही राशीच्या ‘लव्ह पिच’वर उतरतो का? बॉलिवूड व क्रिकेटचे हे नाते पुढे जाते का? हे पाहणे आता इंटरेस्टिंग ठरणार आहे. 

हार्दिकच्या लव्ह लाईफमध्ये बॉलिवूड संदरीची एंट्री?मीडियाच्या रिपोर्टनुसार हार्दिक सध्या अभिनेत्री एली अवरामला डेट करतो आहे. या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला ज्यावेळी हार्दिकचा भाऊ कुणाल पंड्याच्या लग्नात एली पोहोचली. डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये कुणालने पंखुडी शर्मासोबत लग्न केले. लग्नाच्या पूर्ण फंक्शनमध्ये एलीने मोठ्या उत्साहारत सहभाग घेतले. एलीने खूप एन्जॉय केले. याचबरोबर एली हार्दिकसोबत दुसऱ्या फॅमिली फंक्शनमध्ये हजर असते.  दोघांमधील वाढत्या जवळीकतेला बघून नक्कीच हा अंदाज लावण्यात येतो आहे की दोघे मीडियाच्या नजरेपासून लपून एकमेकांना डेट करतायेत.  

टॅग्स :जसप्रित बुमराहविराट कोहली