Video: विराटच्या सुरक्षेत मोठी चूक! सिक्युरिटी गार्ड्सना चकवून तिघे मैदानात घुसले अन्...

Virat Kohli Security failure, Ranji Trophy: विराटच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता, पण त्याच्या सुरेक्षत मोठी चूक झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 18:19 IST2025-02-01T18:18:25+5:302025-02-01T18:19:28+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy Virat kohli security failure 3 fans entered on ground ranji trophy match watch video | Video: विराटच्या सुरक्षेत मोठी चूक! सिक्युरिटी गार्ड्सना चकवून तिघे मैदानात घुसले अन्...

Video: विराटच्या सुरक्षेत मोठी चूक! सिक्युरिटी गार्ड्सना चकवून तिघे मैदानात घुसले अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Security failure, Ranji Trophy Delhi vs Railways : विराट कोहलीने रणजी ट्रॉफीमध्ये १३ वर्षांनंतर सामना खेळला. दिल्ली आणि रेल्वे यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने सहभाग घेतला. या सामन्यात फलंदाज म्हणून विराट काही विशेष करू शकला नसला तरी त्याच्या संघाने एक डाव आणि १९ धावांनी विजय मिळवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यादरम्यान विराटला पाहण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय मैदानात पोहोचला. अशा स्थितीत विराटच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता, पण त्याच्या सुरेक्षत मोठी चूक झाली.

विराट कोहलीच्या सुरक्षेत मोठी चूक

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराटच्या सुरक्षेत मोठी त्रुटी दिसून आली. सुरक्षा भेदून तीन चाहते एकाच वेळी मैदानात घुसले. त्यानंतर मैदानात गोंधळ उडाला. ही घटना रेल्वेच्या दुसऱ्या इनिंग दरम्यान दिसून आली. डावाच्या १८व्या षटकात गौतम गंभीर स्टँडवरून तीन चाहत्यांच्या गट विराटला भेटायला मैदानात आला. यातील एका चाहत्याला विराटच्या पायाला स्पर्श केला. यानंतर सुरक्षारक्षकांनी या तीन चाहत्यांना तात्काळ पकडून मैदानाबाहेर पाठवले. या घटनेदरम्यान अनेक पोलीस आसपास दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

३० जानेवारीला हा सामना सुरु झाला होता. खेळाच्या पहिल्या दिवशीही एका चाहत्याने सुरक्षाकडे तोडले आणि विराटच्या जवळ आला. यावेळी कोहली स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणात व्यस्त होता. तेव्हाही चाहत्याने कोहलीच्या पायाला स्पर्श केला होता. या घटनेनंतर लगेचच सुरक्षारक्षक मैदानावर पोहोचले आणि फॅनला पकडून स्टेडियमच्या बाहेर काढले. त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता. दरम्यान, विराटला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने १५ चेंडूत ६ धावा दिल्या. त्याला हिमांशू सांगवानने क्लीन बोल्ड केले. दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

 

Web Title: Ranji Trophy Virat kohli security failure 3 fans entered on ground ranji trophy match watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.