रणजी क्रिकेट : रेल्वेची मुंबईविरुद्ध सुसाट कामगिरी

यजमानांविरुद्ध मोठी आघाडी घेत मिळवली पकड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 09:43 PM2019-12-26T21:43:27+5:302019-12-26T21:44:01+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy : Railways perform well against Mumbai | रणजी क्रिकेट : रेल्वेची मुंबईविरुद्ध सुसाट कामगिरी

रणजी क्रिकेट : रेल्वेची मुंबईविरुद्ध सुसाट कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : कर्णधार कर्ण शर्माने केलेल्या शतकी खेळीमुळे यजमान मुंबई संघ रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या ब गटात रेल्वेविरुद्ध बॅकफूटवर आला आहे. कर्णने नाबाद ११२ धावांची खेळी करत रेल्वेला पहिल्या डावात १५२ धावांची मजबूत आघाडी मिळवून दिली. यानंतर दुसºया दिवसअखेर मुंबईकरांची ३ बाद ६४ धावा अशी अवस्था करत रेल्वेने सामन्यावर पकड मिळवली.
वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात मुंबईचा पहिला डाव ११४ धावांत गुंडाळल्यानंतर रेल्वेने पहिल्या डावात ७४.१ षटकात २६६ धावांची मजल मारली. कर्णने १४६ चेंडूत १५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ११२ धावांचा तडाखा दिला. अरिंदम घोषनेही १३० चेंडूत १२ चौकारांसह ७२ धावांची खेळी करत मुंबईकरांची परीक्षा घेतली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी ११६ धावांची दमदार भागीदारी केली. मुंबईकडून तुषार देशपांडे (४/४४) आणि दीपक शेट्टी (३/३५) यांनी चांगला मारा केला.
यानंतर दुसºया डावात पुन्हा एकदा मुंबईची घसरगुंडी उडाली. पृथ्वी शॉ (२३) आणि जय बिस्त (१३) हे सलामीवीर अपयशी ठरल्यानंतर संकटमोचक सिध्देश लाड (८) हाही स्वस्तात परतला. यामुळे मुंबईची ४५ धावांत ३ बाद अशी अवस्था झाली. स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने अत्यंत संथ खेळी करत मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने दिवसअखेर नाबाद राहत ४५ चेंडूंत ३ धावा केल्या आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव ३८ चेंडूंत ३ चौकारांसह १५ धावा काढून खेळपट्टीवर आहे.

Web Title: Ranji Trophy : Railways perform well against Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.