रणजी करंडक : मुंबईच्या विजयाची औपचारिकता बाकी

Ranji Trophy 2026: बलाढ्य मुंबई संघाने रणजी करंडक एलिट ड गटातील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी हैदराबादला फॉलोऑन दिला. यानंतर मुंबईने हैदराबादची दुसऱ्या डावात ७ बाद १६६ धावा अशी अवस्था करीत बोनस गुणांसह विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. हैदराबाद संघ अजूनही १२७ धावांनी पिछाडीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 08:21 IST2026-01-25T08:19:19+5:302026-01-25T08:21:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ranji Trophy: Mumbai's victory is still a formality | रणजी करंडक : मुंबईच्या विजयाची औपचारिकता बाकी

रणजी करंडक : मुंबईच्या विजयाची औपचारिकता बाकी

हैदराबाद -  बलाढ्य मुंबई संघाने रणजी करंडक एलिट ड गटातील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी हैदराबादला फॉलोऑन दिला. यानंतर मुंबईने हैदराबादची दुसऱ्या डावात ७ बाद १६६ धावा अशी अवस्था करीत बोनस गुणांसह विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. हैदराबाद संघ अजूनही १२७ धावांनी पिछाडीवर आहे.

मुंबईकडून फिरकीपटू हिमांशू सिंगने उत्कृष्ट गोलंदाजी करीत २७ षटकांत १० निर्धाव षटकांसह ३९ धावांत ३ बळी घेतले. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे (६८ धावांत दोन बळी) आणि मोहित अवस्थी (५४ धावांत दोन बळी) यांनीही त्याला मोलाची साथ दिली. मुंबईच्या ५६० धावांच्या प्रत्युत्तरात हैदराबादने तिसऱ्या दिवसाची सुरुवात २ बाद १३८ धावांपासून केली होती. मात्र, पहिला डाव २६७ धावांत आटोपला. मुशीर खान, सलामीवीर अखिल हेरवाडकर आणि ओंकार तरमाळे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पहिल्या डावात २९३ धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर मुंबईने हैदराबादला फॉलोऑन दिला. राहुल सिंगने हैदराबादकडून झुंजार खेळी करताना १४४ चेंडूत ११ चौकार व एका षटकारासह ९६ धावा केल्या.

दुसऱ्या दिवशी दुखापतीमुळे अथर्व अंकोलेकर सामन्याबाहेर गेला होता. त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेले होते. त्याच्या जागी संघाने तरमाळेला अंतिम अकरामध्ये समाविष्ट केले. यानंतर, हैदराबादच्या फलंदाजांकडून दुसऱ्या डावातही निराशाजनक कामगिरी झाली. दुसऱ्या डावात मोहित अवस्थी (३१ धावांत ३ बळी) आणि मुशीर खान (३८ धावांत ३ बळी) यांनी हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, हैदराबादने दुसऱ्या डावात १६६ धावांत ७ फलंदाज गमावले होते. दुसऱ्या डावात हैदराबादकडून राहुल (३३), हिमतेजा (४३) यांनी लढत दिली. खेळ थांबला तेव्हा चामा मिलिंद ४२ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ३० धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक :
मुंबई (पहिला डाव) : १२३.२ षटकांत सर्वबाद ५६० धावा.
हैदराबाद (पहिला डाव) : ८२.२ षटकांत सर्वबाद २६७ धावा. (राहुल सिंग ९६, किदिमेला हिमतेजा ४०; हिमांशू सिंग ३/३९, मोहित अवस्थी २/५४, तुषार देशपांडे २/६८.)
हैदराबाद (दुसरा डाव) : ३९.३ षटकांत ७ बाद १६६ धावा. (किदिमेला हिमतेजा ४३, राहुल सिंग ३३, चामा मिलिंद खेळत आहे ३०; ओंकार तरमाळे १/२६, मुशीर ३/३८.)

Web Title : रणजी ट्रॉफी: मुंबई हैदराबाद के खिलाफ जीत के करीब

Web Summary : रणजी ट्रॉफी में मुंबई का हैदराबाद पर दबदबा, फॉलो-ऑन लागू। शानदार गेंदबाजी प्रदर्शन से मुंबई बोनस-अंक जीत के करीब। हैदराबाद 127 रनों से पीछे।

Web Title : Ranji Trophy: Mumbai close to victory against Hyderabad.

Web Summary : Mumbai dominates Hyderabad in Ranji Trophy, enforcing follow-on. Excellent bowling performance puts Mumbai on the brink of bonus-point victory. Hyderabad trails by 127 runs.