Join us  

रणजी क्रिकेट: महाराष्ट्र संघाला पहिल्या डावात मुंबईविरुद्ध ७९ धावांची आघाडी

रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत यंदाच्या मोसमात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील लढत अनिर्णीत अवस्थेकडे झुकली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 1:35 AM

Open in App

पुणे : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत यंदाच्या मोसमात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील लढत अनिर्णीत अवस्थेकडे झुकली आहे. गोलंदजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या डावात ७९ धावांची आघाडी घेतली. तिसºया दिवसअखेर दुसºया डावात या संघाने ५ बाद ११२ अशी मर्यादित मजल मारली.महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील मैदानावर इलिट ‘अ’ गटातील ही सुरू आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील ३५२ धावांच्या उत्तरात मुंबईचा डाव २७३ धावांवर आटोपला. कर्णधार सिद्धेश लाड (९०), आदित्य तरे (६३) आणि अष्टपैलू शुभम रांजणे (नाबाद ५४) यांचा अपवाद वगळता मुंबईचे इतर फलंदाज अपयशी ठरले. महाराष्ट्रातर्फे आशय पालकरने ४ तर, समद फल्लाने ३ बळी घेत आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. पहिल्या डावात ७९ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेणाºया महाराष्ट्राच्या फलंदाजांना दुसºया डावात चांगली कामगिरी करता आली नाही. चांगल्या सलामीनंतर आघाडी आणि मध्यफळीतील फलंदाज झटपट बाद झाल्याने यजमानांची सामन्यावरील पकड सैल झाली. कर्णधार राहुल त्रिपाठी १३ तर सत्यजित बच्छाव ३ धावांवर खेळत होते. दिवसअखेर महाराष्ट्राकडे १९१ धावांची आघाडी असून दुसºया डावात अद्याप ५ फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत.कालच्या ५ बाद १९६ वरून आज पुढे खेळणाºया मुंबईने आपले उर्वरित ५ फलंदाज २३.५ षटकांमध्ये ७७ धावांत गमावले. काल ७० धावांवर नाबाद असलेला कर्णधार सिद्धेश लाडला आज समद फल्लाने शतकापासून ७ धावांनी वंचित ठेवले. यष्टीरक्षक रोहित मोटवानीकडे झेल देऊन बाद होण्यापूर्वी सिद्धेशने १८० चेंडूंत १ षटकार आणि १३ चौकारांसह ९३ धावा केल्या. त्याने शुभम रांजणेसह सहाव्या गड्यासाठी ५१ धावांची भागिदारी केली.सिद्धेश बाद झाला तेव्हा मुंबईच्या ६ बाद २३२ धावा झाल्या होत्या. त्यानंतर शुभमने एक बाजू लावून धरली. मात्र त्याला दुसºया बाजूने अपेक्षित साथ लाभली नाही. आकाश पारकरने ३ धावा केल्या, तर ध्रुमिल मटकर, शिवम मल्होत्रा आणि रॉयस्टन डियास यांना भोपळाही फोडता आला नाही. तरीही शुभमच्या फलंदाजीमुळे मुंबईने पावणेतीनशेच्या घरात मजल मारली. त्याने १०१ चेंडूंतील नाबाद ५४ धावांच्या खेळीत २ षटकार आणि ५ चौकार लगावले. पहिल्या डावात आघाडी घेणाºया महाराष्ट्राला स्वप्निल गुगळे-चिराग खुराणा जोडीने दुसºया डावातही चांगली सलामी दिली. हे पाहता महाराष्ट्र मोठी आघाडी घेऊन सामन्यावर पकड मिळविणार, असे वाटत होते. मात्र, सलामी जोडीनंतरचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. यामुळे महाराष्ट्राची अवस्था बिनबाद ५८ वरून ४ बाद ८९ अशी झाली. स्वप्निलने ३७ तर चिरागने ३८ धावा केल्या. जय पांडे (९), नौशाद शेख (४), रोहित मोटवानी (१) यांनीनिराशा केली.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : पहिला डाव : सर्व बाद ३५२.मुंबई : पहिला डाव : ८०.५ षटकांत सर्व बाद २७३ (सिद्धेश लाड ९३, आदित्य तरे ६३, शुभम रांजणे नाबाद ५४, जय बिश्त २७, आशय पालकर ४/६७, समद फल्ला ३/५५, चिराग खुराणा १/२, सत्यजित बच्छाव १/३२).महाराष्ट्र : दुसरा डाव : ५२ षटकांत ५ बाद ११२ (चिराग खुराणा ३८, स्वप्निल गुगळे ३७, राहुल त्रिपाठी खेळत आहे १३, शिवम दुबे २/७, आकाश पारकर १/२१).

टॅग्स :रणजी करंडकमुंबईमहाराष्ट्र