Join us

Ranji Trophy Final : सौराष्ट्राची पश्चिम बंगालवर मात; ७३ वर्षांत पहिल्यादाच पटकावलं विजेतेपद

आज झालेल्या रणजीच्या बंगालविरुद्धच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने विजय मिळत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 17:24 IST

Open in App

रणजी  करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने पंश्चिम बंगालला पराभूत करत पहिल्यांदा विजेचेपद पटाकवले आहे. गेल्या ८ वर्षांच्या कालावधीत सौराष्ट्राने तब्बल ४ वेळा रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली होती, मात्र या चारही वेळा त्यांना अपयश आलं. पंरतु आज झालेल्या रणजीच्या बंगालविरुद्धच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने विजय मिळत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आहे.

सौराष्ट्र संघाने पहिल्या डावात ४२५ धावा केल्या होत्या. तर पश्चिम बंगलाने पहिल्या डावात ३८१ धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या दिवशी बंगालला जिंकण्यासाठी 72 धावांची गरज होती. तर सौराष्ट्रला 4 गडी बाद करण्याची गरज होती. बंगालकडून अनुस्तुप मजूमदार (६३) आणि अर्णब नंदी (नाबाद ४०) यांनी गुरुवारी अखेरच्या सत्रात ९१ धावांची भागिदारी होती. मात्र शेवटच्या दिवशी सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटनं मजूमदारला स्थिरावण्यास वेळच दिला नाही. मजूमदार 63 धावांवर खेळत असतानाच पायचित झाला. त्याच षटकात जयदेवनं आकाशदीपला धावबाद केलं. याच आघाडीच्या जोरावर सौराष्ट्राने रणजी करंडकाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आहे.

बंगालच्या फलंदाजांनाही चांगला खेळ केला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला सुदीप चॅटर्जी, यानंतर मधल्या फळीत वृद्धीमान साहा, अनुस्तुप मुजुमजार यांनी अर्धशतकी खेळी करत बंगालची झुंज सुरु ठेवली. सौराष्ट्राच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करताना या फलंदाजांनी काही चांगले फटके खेळले. मात्र मोक्याच्या क्षणी या फलंदाजांना बाद करण्यात सौराष्ट्राचे गोलंदाज यशस्वी ठरले.

टॅग्स :पश्चिम बंगालरणजी करंडक