Ranji Trophy Final: "मी सर्वात कमी धावा केल्या पण...", विजयानंतर रहाणेची लै भारी प्रतिक्रिया

mumbai vs vidarbha final: मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये बाजी मारून ८ वर्षानंतर चषक उंचावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 06:35 PM2024-03-14T18:35:36+5:302024-03-14T18:39:28+5:30

whatsapp join usJoin us
ranji trophy final I am lowest scorer, but we are Ranji Trophy champions says captain Ajinkya Rahane after won the title  | Ranji Trophy Final: "मी सर्वात कमी धावा केल्या पण...", विजयानंतर रहाणेची लै भारी प्रतिक्रिया

Ranji Trophy Final: "मी सर्वात कमी धावा केल्या पण...", विजयानंतर रहाणेची लै भारी प्रतिक्रिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final: मुंबई संघाने रणजी करंडक विक्रमी ४२ वेळा जिंकण्याची किमया साधली. गुरूवारी विदर्भला नमवून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबई संघाने ८ वर्षांच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. मुंबईने विदर्भचा १६९ धावांनी पराभव करत ट्रॉफी जिंकली. तिसऱ्यांदा रणजी करंडक जिंकण्याचे विदर्भचे स्वप्न भंगले. मुंबईने ४२ वेळा रणजी ट्रॉफीवर कब्जा केला आहे. मुंबईच्या या विजयात गोलंदाज तनुष कोटियनची मोलाची भूमिका राहिली. त्याने दोन्ही डावात एकूण ७ बळी घेतले. तर दुसऱ्या डावात मुंबईचा फलंदाज मुशीरने ३२६ चेंडूंचा सामना करत १३६ धावांची शतकी खेळी केली. कर्णधार अजिंक्य रहाणे ७३ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरच्या बॅटमधून ९५ धावा निघाल्या. याशिवाय शम्स मुलाणीनेही अर्धशतक झळकावले.

रणजी करंडक २०२३-२४ चा हंगाम मराठमोळ्या रहाणेसाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. रहाणेने ८ सामन्यात एकूण २१८ धावा केल्या. रहाणेने अंतिम सामन्यात ७३ धावांची खेळी केली. त्याने मुशीर खानसोबत १३० धावांची भागीदारी नोंदवली. विजयानंतर रहाणेने सांगितले की, चढ उतार हे येतच असतात. तो सामन्याचा एक भाग आहे. मी स्वतःसाठी कधीच विचार केला नाही, माझ्यासाठी संघ पहिला आहे. मला यावेळी चांगल्या धावा करता आल्या नाहीत. पण तरीही संघ चॅम्पियन झाला याचा आनंद आहे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात वाईट काळ येतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी सतत मेहनत करावी लागते.

मुंबईने ८ वर्षानंतर जिंकला चषक 
दरम्यान, अंतिम सामन्यात मुंबईने दिलेल्या ५३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भने चिवट खेळ करताना चौथ्या दिवसअखेर ९२ षटकांत ५ बाद २४८ धावा केल्या होत्या. करुण नायरने विदर्भाच्या आशा कायम राखताना २२० चेंडूंत ७४ धावा केल्या होत्या. परंतु दिवसातील ३२ चेंडू शिल्लक असताना करुणला बाद करत मुशीर खानने मुंबईला पूर्ण पकड मिळवून दिली. विदर्भचा कर्णधार अक्षय वाडकरने पाचव्या दिवशी शतक झळकावून खिंड लढवली होती. पण, १९९ चेंडूंत १०२ धावांवर तो बाद झाला आणि मुंबईचा विजय पक्का झाला. मुंबईने १६९ धावांनी सामना जिंकला.

Web Title: ranji trophy final I am lowest scorer, but we are Ranji Trophy champions says captain Ajinkya Rahane after won the title 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.