Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ranji Trophy Final : फुल्ल राडा! जम्मू-काश्मीरच्या कॅप्टनने कर्नाटकच्या फिल्डरला मारली टक्कर; मयंक अग्रवाल आला अन्...

रणजी फानयलमध्ये मैदानात नेमक कधी आणि काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 14:53 IST

Open in App

Ranji Trophy Final 2026 Jammu And Kashmir Captain Paras Dogra vs Karnataka KV Aneesh : देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित रणजी करंडक २०२५-२६ च्या हगामातील जेतेपदासाठी कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर यांच्यातील अंतिम सामना रंगला आहे. पहिल्यांदाच फायनल खेळणाऱ्या जम्मू काश्मीरच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात कर्नाटकचा कर्णधार पारस डोगरा हा स्लेजिंग करणाऱ्या खेळाडूवर चांगलाच चिडला. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

स्लेजिंगचा खेळ अन् टशन!

स्लेजिंगचा खेळ थांबवण्यासाठी जम्मू काश्मीरच्या कर्णधाराने  हेल्मेट घालून फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटवर टक्कर मारत  टशन दिल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर  मैदानातील वातावरण चांगलेच तापले. पारस याने कर्नाटकचा आणि टीम इंडियाचा अनुभवी बॅटर मयंक अग्रवाल यालाही डोळ्यात डोळे रोखून खुन्नस देताना दिसून आले. रणजी फायनलमध्ये भर मैदानात झालेला राडा दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

रणजी फानयलमध्ये नेमक कधी आणि काय घडलं?

जम्मू-काश्मीरच्या डावातील १०१ व्या षटकात बदली खेळाडूच्या रुपात क्षेत्ररक्षणासाठी आलेला के.व्ही अनीश शॉर्ट लेगवर फील्डिंग करत होता. पारस डोगराने प्रसिद्ध कृष्णा यांच्या उसळच्या चेंडूवर सुंदर फटका मारला. जो सीमारेषेबाहेर गेला. त्यानंतर डोगरा आपल्या नॉन स्ट्राईकवर असलेल्या कनहैया वधावनसोबत चर्चा करत होता. यावेळी अनीश स्लेजिंग करत असल्याचे पाहून तो चांगलाच चिडला. पारस डोगरा थेट अनीशच्या दिशेनं गेला आणि हेल्मेटसह त्याने हेल्मेट घालून फिल्डिंग करणाऱ्या अनिशला टक्कर मारत राग व्यक्त केला. हे पाहून अनुभवी मयंक अग्रवालसह मैदानातील पंचांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवले. हा मुद्दा सोशल मीडियावर चांगलाच गाजताना दिसतो.

जम्मू काश्मीरची तगडी फलंदाजी

मॅचबद्दल बोलायचं तर नाणेफेक जिंकून जम्मू काश्मीरचा कर्णधाराने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शुभमन पुनधीरच्या १२१ (२४७) शतकी खेळीनंतर कर्णदार पारस डोगरा ७० (१६६), यावेर हसन ८८ (१५०), अब्दुल समद ६१ (१०४) आणि कन्हैया वाधवान ७०(१०९ यांच्या अर्धशतके झळकावली. जम्मू काश्मीरचा संघ पहिल्या डावात पाचशी पारच्या जवळ पोहचल्याचे पाहायला मिळाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ranji Trophy Final: Captain's clash ignites tension between Jammu & Kashmir, Karnataka.

Web Summary : Ranji Trophy final heats up as Jammu & Kashmir captain clashes with Karnataka fielder over sledging. On-field drama involved Mayank Agarwal's intervention. Jammu Kashmir's strong batting performance marked the match.
टॅग्स :रणजी करंडकबीसीसीआयमयांक अग्रवाल