रणजी क्रिकेट : केदार जाधवचे दुसऱ्या डावात नाबाद शतक

रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत सुरू असलेल्या इलिट गटातील लढतीत छत्तीसगडने महाराष्ट्राविरूद्ध सोमवारी २२३ धावांची मोठी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 01:49 AM2018-12-25T01:49:51+5:302018-12-25T01:50:38+5:30

whatsapp join usJoin us
 Ranji Trophy: Centuries from Kedar Jadhav's second innings in the second innings | रणजी क्रिकेट : केदार जाधवचे दुसऱ्या डावात नाबाद शतक

रणजी क्रिकेट : केदार जाधवचे दुसऱ्या डावात नाबाद शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत सुरू असलेल्या इलिट गटातील लढतीत छत्तीसगडने महाराष्ट्राविरूद्ध सोमवारी २२३ धावांची मोठी आघाडी घेतली. दुसºया डावात महाराष्ट्रातर्फे केदार जाधवने नाबाद शतक झळकावले असले तरी हा संघ अद्याप ५१ धावांनी मागे आहे.
रायपूरमधील शहीद वीर नारायणसिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत सुरू आहे. कालच्या ५ बाद ३३२ वरून पुढे खेळणाºया यजमान छत्तीसगडचा पहिला डाव आज ४६२ धावांवर आटोपला. अजय मंडल (१३५) आणि अमनदीप खरे (१०८) यांच्यापाठोपाठ आशुतोषसिंग (११४) यानेही शतक झळकावले. महाराष्ट्रातर्फे मध्यमगती गोलंदाज अनुपम संकलेचा याने ८९ धावांत ५ गडी बाद केले. पहिल्या डावात २२३ धावांनी माघारलेल्या महाराष्ट्राने पहिल्या डावाच्या तुलनेत दुसºया डावात चांगली फलंदाजी करीत दिवसअखेर ३ बाद १७२ धावा केल्या. यात प्रमुख योगदान आहे ते स्टार फलंदाज केदारचे. शानदार शतक झळकावणारा केदार १०३ धावांवर खेळत आहे. महाराष्ट्राचा संघ अद्याप छत्तीसगडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा ५१ धावांनी मागे असून उद्या (दि. २५) सामन्याचा अखेरचा दिवस आहे.
काल १०६ धावांवर नाबाद असलेला अजय मंडल आज आणखी २९ धावांची भर घालून बाद झाला. काल ७५ धावांवर नाबाद असलेल्या आशुतोषनेही आज शतक पूर्ण केले. डावात छत्तीसगडतर्फे शतक नोंदविणारा तो तिसरा फलंदाज ठरला. दुसºया दिवशी अमनदीपने शतक झळकावले होते. अजय-आशुतोष यांनी सहाव्या गड्यासाठी १८० धावांची भागिदारी करीत छत्तीसगडला मोठी आघाडी मिळवून दिली. यष्टीरक्षक फलंदाज मनोजसिंग याने ३५ धावा करीत आपल्या संघाला साडेचारशेपार नेले. महाराष्ट्रातर्फे समद फल्ला आणि चिराग खुराणा यांनी प्रत्येकी २ तर, स्वप्नील गुगळे याने १ बळी घेत संकलेचाला
साथ दिली.

दबावाखाली केदारची नैसर्गिक फलंदाजी...
पहिल्या डावात मोठ्या फरकाने माघारलेल्या महाराष्ट्राच्या दुसºया डावाचा प्रारंभ निराशाजनक झाला. स्वप्निल गुगळे (७)-चिराग खुराणा (१२) ही सलामी जोडी अवघ्या २४ धावांवर तंबूत परतली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या अनुभवी केदारने छत्तीसगडच्या गोलंदाजांचा दबाव झुगारून देताना आपल्या नैसर्गिक शैलीने फलंदाजी केली. पहिल्या डावात भोपळाही फोडू न शकलेल्या या ३३ वर्षीय फलंदाजाने दुसºया डावात मात्र आक्रमक खेळी केली. केदारने ११४ चेंडूंतील नाबाद १०४ धावांच्या खेळीत १ षटकार आणि १५ चौकार लगावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे हे १४वे शतक ठरले. केदारने ऋतुराज गायकवाडसोबत तिसºया गड्यासाठी ९३ धावांची भागिदारी करीत महाराष्ट्राला सावरले. ऋतुराज बाद झाल्यानंतरही केदारचा धडाका सुरूच होता. त्याने कर्णधार अंकित बावणेसह चौथ्या गड्यासाठी नाबाद ५५ धावांची भागिदारी केली. यात अंकितचा वाटा केवळ १० धावांचा आहे.

संक्षिप्त धावफलक :
महाराष्ट्र : पहिला डाव : सर्व बाद २३९.
छत्तीसगड : पहिला डाव : १४०.५ षटकांत सर्व बाद ४६२ (अजय मंडल १३५, आशुतोषसिंग ११४, अमनदीप खरे १०८, अनुपम संकलेचा ५/८९, समद फल्ला २/६९, चिराग खुराणा २/७७, स्वप्नील गुगळे १/२३).
महाराष्ट्र : दुसरा डाव : ४४ षटकांत ३ बाद १७२ (केदार जाधव खेळत आहे १०३, ऋतुराज गायकवाड ३४, चिराग खुराणा १२, ऋतुराज गायकवाड ७, अंकित बावणे खेळत आहे १०, ओंकार वर्मा ३/५३).

Web Title:  Ranji Trophy: Centuries from Kedar Jadhav's second innings in the second innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे