रणजी करंडक स्पर्धेतील २०२५-२६ च्या हंगामातील पहिल्या फेरीतील तीन सामन्यांचा निकाल हा तिसऱ्या दिवशी लागल्याचे पाहायला मिळाले. यात गत रणजी करंडक स्पर्धेतील विजेता विदर्भ संघाने अगदी झोकात नव्या हंगामाची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. विदर्भ संघाशिवाय वैभव सूर्यवंशीच्या बिहारच्या संघासह हरयाणा संघाने तिसऱ्या दिवशी सामना जिंकल्याचे पाहायला मिळाले. इथं एक नजर टाकुयात नव्या हंगामातील तिसऱ्या दिवशी निकाली लागलेल्या तीन सामन्यात कोण ठरलं लक्षवेधी त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विदर्भ संघाकडून अमन मोखाडेचीमोठी खेळी, गोलंदाजीत कुणी सोडली छाप?
गत रणजी चॅम्पियन विदर्भ संघाने यंदाच्या हंगामाची सुरुवातही अगदी धमाक्यात केली. एलिट ग्रुप ए मध्ये नागालँड विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना विदर्भ संघाने पहिल्या डावात ४६३ धावा केल्या होत्या. अमन मोखाडेच्या १८३ धावांच्या शतकी खेळीशिवाय ध्रुव शोर्य ६४ (९) आणि यश राठोड ७१ (११८) यांच्या अर्धशतकाचा समावेश होता. नागालँडच्या संघाला दोन वेळा बॅटिंग करूनही सामना जिंकायचा सोडा चौथ्या दिवसापर्यंत खेचता आला नाही. पहिल्या डावात १७१ धावांवर ऑलआउट झाल्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढावलेला नागालँडचा संघ दुसऱ्या डावात ११३ धावांत आटोपला. विदर्भ संघाने १ डाव आणि १७९ धावांनी दिमाखात यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिली.
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
वैभव सूर्यवंशीच्या ताफ्यातून आयुश लोहारुकाची हवा
बिहारच्या संघानं पहिल्या फेरीतील लढतीत अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात धावांचा डोंगर उभारला होता. वैभव सूर्यंवशी अपयशी ठरल्यावर आयुष लोहारुका याने २२६ (२२७) केलेल्या द्विशतकी खेळीशिवाय अर्णव किशोर ५२ (७०), कर्णधार गनी ५९ (८६), बिपीन सौरभ ५२(७८) आणि सचिन कुमार ७५ (९२) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर बिहारच्या संघाने पहिल्या डावात ५४२ धावा केल्या होत्या. अरुणाचल प्रदेशच्या संघाला पहिल्या डावात १०५ धावांवर आटोपला. तिसऱ्या दिवशी २७२ धावांत दुसऱ्यांदा त्यांना ऑलआउट करत बिहारच्या संघानं डावासह १६५ धावांनी सामना जिंकला. बिहारकडून गोलंदाजीत शाकीब हसन याने १० विकेट्सचा डाव साधला.
हरयाणाकडून पर्थनं दोन्ही डावात केली धमाकेदार बॅटिंग
अंकित कुमारच्या नेतृत्वाखालील हरयाणाच्या संघाने पर्थ वत्सच्या ५२ (७१) च्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात १७१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रेल्वेच्या संघाने कर्णधार प्रथम सिंगच्या ५० (१२४) खेळीच्या जोरावर पहिल्या डावात १२८ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावात हरयाणाच्या संघाकडून पुन्हा एकदा दुसऱ्या पर्थ वत्सची बॅट तळपली. त्याने १८९ चेंडूत केलेल्या ११० धावांच्या खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात २०५ धावा करत हरयाणाच्या संघाने रल्वेसमोर २४९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना रेल्वेचा संघ १५२ धावांवर आटोपला. हरयाणाच्या संघाने ९६ धावांनी सामना खिशात घातला.
Web Summary : Vidarbha, Bihar, and Haryana secured victories in the Ranji Trophy's first round. Vidarbha dominated, while Bihar's Ayush Loharuka shone with a double century. Haryana's Parth Vats's all-round performance sealed their win.
Web Summary : रणजी ट्रॉफी के पहले दौर में विदर्भ, बिहार और हरियाणा ने जीत हासिल की। विदर्भ का दबदबा रहा, जबकि बिहार के आयुष लोहारुका ने दोहरा शतक जड़ा। हरियाणा के पार्थ वत्स के हरफनमौला प्रदर्शन ने उनकी जीत सुनिश्चित की।