२३ चौकार, ५ षटकार! आखणी एका भारतीयाचे त्रिशतक, मोडला १९८९ सालचा मोठा विक्रम, video

Ranji Trophy 2024 :  तामिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज नारायण जगदीसन ( Narayan Jagadeesan) याने रणजी ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा अप्रतिम खेळी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 05:52 PM2024-01-27T17:52:03+5:302024-01-27T17:52:50+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy 2024 : Narayan Jagadeesan's 321 vs Chandigarh is now the HIGHEST ever individual score for Tamil Nadu in men's FC cricket | २३ चौकार, ५ षटकार! आखणी एका भारतीयाचे त्रिशतक, मोडला १९८९ सालचा मोठा विक्रम, video

२३ चौकार, ५ षटकार! आखणी एका भारतीयाचे त्रिशतक, मोडला १९८९ सालचा मोठा विक्रम, video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ranji Trophy 2024 :  तामिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज नारायण जगदीसन ( Narayan Jagadeesan) याने रणजी ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा अप्रतिम खेळी केली आहे. चंदीगड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात जगदीसनने तिहेरी शतक झळकावले आणि १९८९ सालचा तामिळनाडूकडून डब्लू व्ही रमन यांनी नोंदवलेला विक्रम मोडला. जगदीसनचे हे सलग सलग दुसरे द्विशतक ठरले. याआधी जगदीसनने रेल्वेविरुद्धच्या रणजी सामन्यात २४५ धावांची नाबाद खेळी केली होती.  

SRH ला IPL पूर्वी 'हिरा' सापडला; पठ्ठ्याने ६० चेंडूंत २९२ धावा चोपून विक्रमांचा पाऊस पाडला


रणजी करंडक स्पर्धेत किमान दोन द्विशतके करणारा तो तामिळनाडूचा तिसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी डब्ल्यूव्ही रमणने १९८८-८९ च्या मोसमात ३ द्विशतके झळकावली होती. त्याच रमण यांनी १९९१-९२ मध्ये २ द्विशतके झळकावली होती. जगदीसनच्या आधी अभिनव मुकुंदने २०११-१२ हंगामात दोन द्विशतके झळकावण्याचा पराक्रमही केला होता.


 चंदीगडने तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, पहिल्या डावात चंदीगडचा संघ १११ धावांत ऑलआऊट झाला. संदीप वॉरियर आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तामिळनाडूने दुसऱ्या दिवशी ४ बाद ६१० धावांवर डाव घोषित केला आणि ४९९ धावांची आघाडी घेतली. तामिळनाडूकडून प्रदोश रंजन पॉल ( १०५) व बाबा इंद्रजित ( १२३) यांनीही शतक झळकावले. 


जगदीसनने ४०३ चेंडूंत २३ चौकार व ५ षटकारांसह ३२१ धावांची विक्रमी खेळी केली. तामिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. १९८९ मध्ये डब्लू व्ही रमण यांनी गोवाविरुद्ध ३१३ धावा केल्या होत्या आणि तो विक्रम आज जगदीसनने मोडला. १९८९मध्ये अर्जन क्रिपाल सिंग यांनी गोवाविरुद्ध नाबाद ३०२ आणि २००८ मध्ये अभिनव मुकूंदने महाराष्ट्रविरुद्ध नाबाद ३०० धावा केल्या होत्या.  प्रथम श्रेणी स्पर्धेत सलग दोन सामन्यांत द्विशतक झळकावणारा जगदीसन १८ वा फलंदाज ठरला. विराट कोहली, मिलिंद कुमार व सर्फराज खान हे जगदीसनच्या आधी असा पराक्रम करणारे तीन फलंदाज आहेत.  

Web Title: Ranji Trophy 2024 : Narayan Jagadeesan's 321 vs Chandigarh is now the HIGHEST ever individual score for Tamil Nadu in men's FC cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.