Ranji Trophy Final: मुंबई vs विदर्भ! रहाणे-अय्यर स्वस्तात बाद; क्रिकेटचा देवही रमला, वानखेडेवर थरार

Ranji Trophy 2024 Final, Mumbai vs Vidarbha: किताबासाठी मुंबई आणि विदर्भ यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 01:42 PM2024-03-10T13:42:45+5:302024-03-10T13:43:01+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy 2024 Final, Mumbai vs Vidarbha Vidarbha won the toss and elected to bowl first, Ajinkya Rahane and Shreyas Iyer were dismissed cheaply, Sachin Tendulkar posted on social media  | Ranji Trophy Final: मुंबई vs विदर्भ! रहाणे-अय्यर स्वस्तात बाद; क्रिकेटचा देवही रमला, वानखेडेवर थरार

Ranji Trophy Final: मुंबई vs विदर्भ! रहाणे-अय्यर स्वस्तात बाद; क्रिकेटचा देवही रमला, वानखेडेवर थरार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mumbai vs Vidarbha । मुंबई: रविवारपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रणजी करंडक स्पर्धा २०२३-२४ चा अंतिम सामना खेळवला जात आहे. महाराष्ट्रातील दोन संघ किताबासाठी मैदानात आहेत. (mum vs vid ranji final) मुंबई आणि विदर्भ यांच्यात ही लढत होत आहे. या बहुचर्चित सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी क्रिकेटप्रेमी सज्ज आहेत. क्रिकेटचा देव म्हणून तमाम भारतीयांनी ज्याला भरभरून प्रेम दिले तो सचिन तेंडुलकरही या सामन्याचा आनंद घेत आहे. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली.

विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईने शानदार सुरुवात केली. पण त्यानंतर विदर्भाने पुनरागमन करत पहिले सत्र आपल्या नावावर केले. मुंबईने ४४ षटकांपर्यंत ६ बाद १३२ धावा केल्या. पृथ्वी शॉ (४६), भूपेल लालवानी (३७), मुशीर खान (६), अजिंक्य रहाणे (७), श्रेयस अय्यर (७) आणि हार्दिक तमोर (५) धावा करून बाद झाला. शम्स मुलाणी आणि शार्दुल ठाकूर खेळपट्टीवर टिकून आहेत.

सचिन म्हणाला की, चांगली सुरुवात झाल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी सामान्य क्रिकेट खेळले. दुसरीकडे, विदर्भाने पकड बनवत मुंबईवर दबाव आणला. मला खात्री आहे की या सामन्यात अनेक रोमांचक सत्रे होतील. सुरुवातीला खेळपट्टीवर बऱ्यापैकी गवत असते पण जसजसा खेळ पुढे जाईल तसा चेंडू फिरेल आणि फिरकीपटूंना मदत मिळेल. मुंबईच्या सलामीवीरांनी केलेल्या भक्कम भागीदारीनंतर त्यांनी ज्या प्रकारे खेळात पुनरागमन केले त्यामुळे विदर्भाच्या संघाला समाधान असेल. पहिले सत्र विदर्भाच्या नावावर राहिले. 

दरम्यान, मुंबई आणि विदर्भाने अंतिम फेरी गाठून विक्रम केला. रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात तब्बल ५३ वर्षांनंतर असे घडले की, अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ एकाच राज्यातील आहेत. आतापर्यंत रणजी करंडकमध्ये दोनदाच असा योगायोग जुळून आला आहे. अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ एकाच राज्यातून आल्याची ही तिसरी वेळ आहे. १९७१ मध्ये प्रथमच महाराष्ट्र आणि मुंबईने अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा मुंबईने अंतिम फेरीत शानदार विजयाची नोंद केली होती. आता पुन्हा एकदा एकाच राज्यातील दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. विदर्भ आणि मुंबईच्या संघाला इतिहासात नाव नोंदवण्याची संधी आहे.

Web Title: Ranji Trophy 2024 Final, Mumbai vs Vidarbha Vidarbha won the toss and elected to bowl first, Ajinkya Rahane and Shreyas Iyer were dismissed cheaply, Sachin Tendulkar posted on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.