Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात रणजी सामन्यास सुरूवात; सौराष्ट्र संघाची प्रथम फलंदाजी, स्थानिकांमध्ये उत्साह

उपहारापर्यंत सौराष्ट्र संघाच्या ५ बाद १०२ धावा झाल्या आहेत.

By appasaheb.patil | Updated: February 2, 2024 15:12 IST

Open in App

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: येथील इंदिरा गांधी पार्क मैदानावर आजपासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र यांच्यातील रणजी क्रिकेट सामना सुरू झाला आहे. सौराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उपहारापर्यंत सौराष्ट्र संघाच्या ५ बाद १०२ धावा झाल्या आहेत.

सोलापूर क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सामन्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक पदाधिकारी यासाठी प्रयत्न करत आहेत. आज शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता सामन्यास सुरुवात झाली. सुरुवातीला सौराष्ट्र संघाने चांगली सुरुवात केली. मात्र महाराष्ट्र संघाच्या गोलंदाजापुढे सौराष्ट्र संघांचे फलंदाजाची खराब कामगिरी झाली. सकाळच्या सत्रात पाच विकेट सौराष्ट्र संघाने गमाविल्या होत्या. केदार जाधव व चेतेश्वर पुजारा यांना पाहण्यासाठी सोलापुरातील क्रिडा प्रेमींनी इंदिरा गांधी स्टेडियमवर मोठी गर्दी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी असोसिएशनने पोलिसांचा व खासगी सुरक्षांचा बंदोबस्त तैनात केला आहे. सामना पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली आहे. २९ वर्षानंतर रणजीचा हा दुसरा सामना सोलापुरात होत आहे.

टॅग्स :सोलापूर