मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या झिम्बाब्वेचे प्रशिक्षक असलेले लालचंद राजपूत यांनी झिम्बाब्वेच्या खेळाडूंसाठी सरावाचे वेळापत्रक तयार केले आहे.
यामध्ये शारीरिक आणि मानसिक व्यायामावर अधिक जोर देण्यात आला आहे. तंत्राच्या माध्यमातूनही राजपूत सध्या झिम्बाब्वेच्या खेळाडूंच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या भारताप्रमाणेच झिम्बाब्वेमध्येही कोरोनामुळे जाहीर केलेला लॉकडाऊन आणखी वाढविण्यात आला आहे. क्रीडा स्पर्धा ठप्प असताना खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी सज्ज ठेवण्याचे आव्हान असते आणि राजपूत यांनी त्यासाठी कंबर कसली आहे. (वृत्तसंस्था)