Join us

राजीव शुक्ला यांचा विराट कोहलीला पाठिंबा

व्यस्त वेळापत्रकाबाबत नाराजी व्यक्त करणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीला आयपीएलचे माजी आयुक्त राजीव शुक्ला यांनी पाठिंबा दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 04:27 IST

Open in App

नवी दिल्ली: ‘विमानाचे लँडिंग झाल्यानंतर थेट स्टेडियम गाठून खेळावे लागेल,’ असे वक्तव्य करीत व्यस्त वेळापत्रकाबाबत नाराजी व्यक्त करणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीला आयपीएलचे माजी आयुक्त राजीव शुक्ला यांनी पाठिंबा दिला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळल्यानंतर पाच दिवसात भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला.एकदिवसीय सामन्याआधी गुरुवारी कोहलीने व्यस्त वेळापत्रकावर चिंता देखील व्यक्त केली. यावर शुक्ला यांनी टिष्ट्वट करताना वेळापत्रक व्यस्त असल्याच्या कोहलीच्या मताशी मी सहमत असल्याचे सांगितले. ‘सलग सामने आणि मालिका व्हायला नकोत, खेळाडूंना विश्रांती आणि तयारीची पूर्ण संधी मिळायला हवी,’ असे मत व्यक्त करीत व्यस्त वेळापत्रकाबद्दल प्रशासकांची समिती (सीओए) दोषी असल्याचा शुक्ला यांनी आरोप केला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :बीसीसीआयविराट कोहली